प्रतिनिधी:- नंदकुमार बगाडे पाटील (9822538415)
अतुलनाना मानेपाटील यांनी आपल्या मार्गदर्शन मध्ये बोलताना म्हणाले…..
आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे अश्या विभागवार समित्या बनविणे जरुरी आहे पण त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणे जरुरी आहे आता या चालू हंगामाचे उदाहरण म्हणून पहा राज्यात काही कारखाने अनुक्रमे 70 दिवस ,काही 80 दिवस ,काही 90 दिवस चालतील आणि सगळ्यांना एकच प्रश्न पडला की ऊस पिका खालील क्षेत्र कमी झाले याला अनेक कारणे आहेत जसे की पाऊसमान कमी झाले , अती वृष्टी झाली ,कोल्हापूर भागात पूर आला एक ना अनेक अशी कारणे आहेत ,कारखाना कार्यक्षेत्रात ऊस कमी आहे, ऊस विकास विभाग वेगळा नाही ,अनेक वर्षात बेणे बदल झाला नाही,पायाभूत बेणे विकसित मळे विकसित झाले नाही ,उच्च साखर उतारा देणाऱ्या आणि चांगले एकरी उत्पादन देणाऱ्या ऊस जातीचा प्रसार आणि प्रचार झाला नाही ,शेतीत आधुनिक तंत्राचा वापर कमी , अती पाण्याचा वापर ,जमिनीचा सामू या बदल आणि जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली ,रासायनिक खतांचे प्रमाण जमीन न तपासता अतिरेकी वापर, मायक्रो न्यूट्रियंट यांचा आणि संतुलित खताचा वापर नाही , कारखाना कार्यक्षेत्रात कृषी मेळावे ,ग्राम सभा ऑफ सीझन मध्ये घेण्यात येत नाहीत , कारखाना कार्यक्षेत्रात ये आई चा वापर नाही , ऊस नोंदी आणि ऊस तोडणी ही काही कारखान्यात कम्प्युटरवर झाली आहे ,
पण ज्यावेळी कार्यक्षेत्र सोडून ऊस गाळपासाठी आणला जातो त्यावेळी ऊस नोंद आणि तोडणी वेळेवर होत असते,या सारखी अनेक कारणे आहेत मित्रानो ,पण त्यात एक महत्वाची गोष्ट अशी की राज्यातील अनेक कारखान्यांनी अमर्याद प्रमाणात गाळप क्षमता वाढविली आहे त्या प्रमाणात ऊस पिकाखालील क्षेत्र वाढले नाही आणि त्यासाठी राज्यातील काही कारखाने वगळता काही कारखान्यांनी ऊस विकास योजना राबविल्या नाहीत त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्याचे दर एकरी उत्पादन वाढले नाही परंतु त्यांचा दर एकरी उत्पादन खर्च वाढला पर्यायाने तो ऊस उत्पादक शेतकरी ऊस लागवडी पासून खूप लांब गेला यासाठी सक्षम ऊस विकास विभाग कारखान्यांनी केला पाहिजे त्यासाठी चांगले पगार ऊस विकास अधिकारी यांना दिले पाहिजेत ,चांगले कृषी ओव्हरशर घेतले पाहिजेत आणि त्यासाठी कारखान्याच्या पदाधिकारी यांनी शेती विभागाकडे इंजिनीयरिंग / रसायन विभागासारखे चांगले पगार दिले पाहिजेत आणि ऊस विभागाने सुद्धा अतिशय जाणीवपूर्वक ऊस विकासाचे म्हणजेच कारखाना कार्यक्षेत्रात कारखान्याचे गाळप शमते इतका आणि चांगल्या साखर उताऱ्याचा ऊस कारखान्याला पुरविला पाहिजे
कारखान्याची गाळप क्षमता 1 वर्षात वाढली जाऊ शकते पण कारखाना कार्यक्षेत्रात ऊस लागवड वाढविण्यासाठी आपणास 2 वर्ष लागतात आणि तेही पाऊसमान चांगले झाले तर अन्यथा गाळप कमी होऊन परत कारखान्याचे अर्थ कारण कोलमडून जाते यात शंका नाही म्हणून शेती खाते हे साखर करण्यात खूप महत्त्वाचे खाते आहे याचा विचार जाणीवपूर्वक होणे जरुरी आहे
12 व्या ऊस परिषद मध्ये मार्गदर्शन करताना अतुलनाना मानेपाटील म्हणाले यावेळी परिषद चे अध्यक्ष किरणभाऊ चव्हाण, उदघाटक रघुनाथदादा पाटील, सचिन पाटील राज्य उपाध्यक्ष ऊस संघ, महेंद्र घाटगे, लक्षमण सूळ, आशिष पाटीलडॉ सुरेश उबाळे राज्य संचालक, युवराज पाटील सांगली जिल्हा अध्यक्ष,धनाजी कदम जिल्हा उपाध्यक्ष, अमोल खोत कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष, ई. उपस्थित
Discussion about this post