वडकशिवाले येथे नाम. हसन मुश्रीफ साहेब वैद्यकिय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार व विकास कामाचा लोकार्पण सोहळा पार पडला.
आजरा: प्रतिनिधी,
वडकशिवालेसारख्या छोट्या
गावाने निवडणूकीत आर्थिक लाभ न घेणे, आदर्श वाचनालय, डेअरी असे उपक्रम राबवले. माझ्या विकासकामांची आठवण ठेवत निवडणूकीत मताधिक्य दिले. परंपरा , आदर्श जोपासणाऱ्या या गावच्या विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही.
वडकशिवाले येथे सत्कारसोहळा व विकासकामांच्या लोकार्पण सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी आजरा कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे होते. स्वागत व प्रास्तविक सुनिल दिवटे यांनी केले .
यावेळी बोलताना अनेक प्रश्रांना हात घातला. आंबेओहोळ धरणग्रस्तांच्या स्वेच्छा पुनर्वसन प्रश्नासाठी पाठपुरावा, बांधकाम कामगारांच्या नोंदणी व नूतनीकरण कार्यालय, उत्तूर येथील निसर्गोपचार व योग महाविद्यालयाच्या कामाची माहिती देताना महिलांना एसटीची ५०% सवलत चालू रहाणार व लाडकी बहिणीची १५०० रुःवरून २१०० रु करण्याचा विचार असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात वसंतराव धुरे यांनी विधानसभा निवडणूकीत वडकशिवाले गावचे मुश्रीफ यांना मताधिक्य दिल्याचा उल्लेख करत गावच्या विकासासाठी पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली. मंत्री मुश्रीफ यांचा ग्रामस्थ, ग्रामपंचायत व विविध संस्थांनी सत्कार केला . व्यासपीठावर सरपंच मयूरी कांबळे, उपसरपंच नितीन सावंत, जिल्हा बँकेचे सुधीर देसाई, माजी उपसभापती शिरिष देसाई, तहसीलदार समीर माने, कारखाना संचालक काशिनाथ तेली, बबन पाटील, विजय वांगणेकर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी पांडूरंग दिवटे, शशी लोखंडे, जयवंत शिंदे, शिवाजी पाटील, तानाजी चव्हाण व ग्राप सदस्य यांची उपस्थिती होती.
आभार महेश शिंदे यांनी मानले.
कॅन्सर मुक्तीच्या दिशेने…….!
महिलांना गर्भाशय कॅन्सरपासून सुटका होण्यासाठी आपल्या मतदार संघातील महिलांना मोफत लस देणार तसेच आंबेओहोळ प्रकल्पातील अतिरिक्त पाणीसाठा जाधेवाडी, मासेवाडी व बहिरेवाडी या गावांना शासकीय उपसासिंचनद्वारे देण्यासाठी प्रयत्न करणार. यासाठी सौरऊर्जा प्रकल्प, जागा यांचा सर्व्हे यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
Discussion about this post