
श्री. रमेश राठोड..
आर्णी तालुक्यातील जवळा येथील गुरुदेव विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात बंजारा संस्कृतीचे अनोखे दर्शन घडले.
महामेळाव्यात उपस्थित मान्यवरांच्या स्वागतासाठी बंजारा समाजातील विद्यार्थिनींनी पारंपरिक बंजारा पोशाख परिधान करून बंजारा गीतावर नृत्य सादर केले. त्यांच्या नृत्यातील लयबद्ध चाली आणि रंगीबेरंगी पोशाखाने उपस्थितांची मने जिंकली. बंजारा संस्कृतीचा गौरवशाली ऐतिहासिक वारसा या सादरीकरणातून प्रभावीपणे साकारण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, उच्च न्यायालय विधी सेवा उपसमितीचे नागपूर सचिव अनिल शर्मा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिन कुणाल नहार, आर्णी विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश व्ही.एम.धोंगडे, जिल्हा पोलिस अपर अधीक्षक पियूष जगताप, जिल्हा वाहतूक पोलीस अधिकारी,आर्णी तहसीलदार वैशाख वाहुरवाघ, आर्णी गटविकास अधिकारी रमेश खारोडे, आर्णी ठाणेदार केशव ठाकरे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने बंजारा संस्कृतीचा समृद्ध वारसा नव्या पिढीसमोर प्रभावीपणे सादर झाला. बंजारा समाजाच्या परंपरा, वेशभूषा आणि नृत्यकलेने कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली..
Discussion about this post