
मुक्ताईनगर – प्रतिनिधी ।
विश्वजीत हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असून त्याच्या दोन बहिणी आहेत. शेतीच्या काही कामानिमित्त तो दिनांक २ मार्च २०२५ रोजी आपल्या मित्रासोबत बऱ्हाणपूर येथे गेला होता. दरम्यान, मध्य प्रदेशातील चापोरा – दापोरा या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात त्याचा मृत्यू झाला.
विश्वजीत हा तालुक्यात सर्वत्र ओळखला जाणारा, मनमिळाऊ आणि प्रेमळ स्वभावाचा तरुण होता. त्याच्या अकाली निधनाने मित्रमंडळी आणि तालुक्यातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या जाण्याने कुटुंबावर आणि मित्रांवर मोठा आघात झाला असून परिसरात शोककळा पसरली आहे..
Discussion about this post