
मानव नेहमीच आपला स्वार्थ साधण्यासाठी वन्य प्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमण करून वन्यप्राण्यांच्या अन्नसाखळीमध्ये बाधा आणण्यास कारणीभूत ठरला आहे. संसाधनाचा वापर करत असतांना तो कुठेही स्वतः शिवाय वन व त्यामधील वन्यप्राण्यांचा विचार करतांना दिसत नाही. त्यामुळेच मानव-वन्यप्राणी संघर्ष निर्माण होत आहे. त्यासाठी खऱ्या अर्थाने वन्यजीवांचे संवर्धन करण्यासाठी भूपातळीवर काम करण्याची गरज आहे असे मत प्राध्यापक रमजान ईरानी यांनी व्यक्त केले. ते ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे “नॅशनल कॉन्फरन्स ऑन रिसेंट मल्टी-डिसिप्लिनरी अॅडव्हान्सेस इन रिसर्च अँड कंजर्वेशन” या विषयावर नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये बोलत होते.
या राष्ट्रीय परिषदेचे उद् घाटन डॉ. अमीर धमानी यांच्या अध्यक्षतेखाली हिस्लॉप कॉलेजचे सीएचएलआर प्राणीशास्त्र विभागाचे संचालक डॉ. रेमंड जे. अँड्र्यू यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर डॉ. सुरेंद्र माणिक, समन्वयक प्राचार्या डॉ. सुनंदा आस्वले उपस्थित होते.
या परिषदेसाठी प्राध्यापक डॉ. गजानन मुरतकर यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी वन परिसरात व वनामध्ये गवताळ भूमीची आवश्यकता त्याचे व्यवस्थापन या विषयावर आपले मत व्यक्त करतांना वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी गवताळ भूमीची वनवृक्षांइतकीच आवश्यकता असून या गवताळ भूमीवरच अन्नासाठी तृणभक्षी वन्यप्राणी अवलंबून असतात. गवताळ भूमीमुळे तृणभक्षी वन्यप्राणी यांच्या संख्येमध्ये वाढ होते.शिवाय जैवविविधेतही वाढ होऊन त्यांचा अधिवास टिकून राहतो असे त्यांनी केलेल्या संशोधनातून दिसून आले.संवर्धनावर नाहक चर्चा करण्यापेक्षा वन व वनपरिसरातील गवताळ भूमींचा विकास करण्यासाठी कार्य करण्याची प्राथमिक गरज आहे असे त्यांनी आपल्या संशोधन पर मार्गदर्शनातून लक्षात आणून दिले.
याशिवाय या परिषदेकरिता यंग सायंटिस्ट डॉ. अजिंक्य कोट्टावार यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आले.त्यांचे स्वतःच्या ४१ पेटंटची नोंद झालेली असून ते बौद्धिक संपदा अधिकार या विषयावर मार्गदर्शन करत असताना संशोधकांनी संशोधन करत असतांना तांत्रिक युगात इनोवेशनला विशेष महत्त्व द्यावे, जनसामन्यांच्या प्राथमिक गरजा लक्षात घेऊन संशोधन करावे. भारतामध्ये आपल्या गरजांच्या परिपुर्ततेसाठी अनेक लोक जुगाड तंत्रज्ञानाचा वापर करून आपले काम भागवत असतात परंतु हयाच जुगाडाला जर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शाश्वत रूप देण्याचा प्रयत्न केल्यास ते इन्वेशन ठरेल व त्याचे पेटंट सुद्धा घेता येईल असे मत व्यक्त केले.
या परिषदेच्या निमित्ताने १८० शोधनिबंधाचे सार प्रकाशित करण्यात आले. या परिषदेला तीनशेहून अधिक सहभागी उपस्थित होते. या निमित्ताने पोस्टर स्पर्धा व मौखिक सादरीकरण घेण्यात येऊन यात विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. या परिषदेच्या निरोपीय समारंभाला डॉ. शशिकांत आस्वले, डॉ. अपर्णा धोटे उपस्थित होते. ही परिषद डॉ. हुंगे, डॉ.संजय साबळे, डॉ. मनोज अरमरकर डॉ. संदिप कागे, डॉ. राहुल मापारी,डॉ. नरेंद्र हरणे, डॉ. पायल वर्मा,डॉ.निलेश उगेमुगे,डॉ. अतुल नागपुरे, डॉ. प्रशांत वाघ,डॉ. प्रवीण गांजरे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडली. ही परिषद यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. निलेश ठवकर, प्रा. विवेक माणिक, डॉ. मृणाल वऱ्हाडे, प्रा. संदिप मेश्राम, डॉ. हुमेश्वर आनंदे, डॉ. युवराज बोधे, डॉ. प्रणाली टेंभुर्ने, डॉ. संदिप सातव, प्रा. नागेश ढोरे, डॉ. बिजनकुमार शील, प्रा. रोहित चांदेकर व महाविद्यालयातील संपूर्ण प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले..
Discussion about this post