
प्रविण इंगळे — उमरखेड तालुका प्रतिनिधी मो.7798767266
उमरखेड –मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना २ मार्च पासुन सुरू झाला असून यादरम्यान मुस्लिम धर्मीय उपवास ठेवत असतात. परंतु लोड शेडिंग मुळे व विद्युत प्रवाह खंडित होत असल्यामुळे उपवासधारकांना त्रास होत आहे.
विद्युत प्रवाह महिनाभरासाठी सुरळीत ठेवावा यासाठी काल मुस्लिम समाजातर्फे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाला निवेदन देण्यात आले.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून दिवसेंदिवस उन्हाचा पारा हा वाढत आहे. परंतु ऐन उन्हाळ्यातच मुस्लिम समाजाचे रमजान महिन्यातील उपवास सुरु झाले असून हे उपास ठेवणे बंधनकारक असतात. दिवसभर काहीही न खाता- पिता उपवास धरणाऱ्यांना आराम करावे लागते यामुळें घरगुती यंत्रणे, पंखा व कुलरची आवश्यकता असते.
परंतु विद्युत महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे विजेचा लपंडाव हा सुरूच असतो. दिनांक २ मार्च रोजी रमजान महिन्याच्या पहिल्याच उपवासाच्या दरम्यान सकाळी १०:३० ते ५ पर्यंत विद्युत प्रवाह खंडित होता. यामुळे उपासकांना त्रास सहन करावा लागला.
ही बाब लक्षात येताच शाहरुख पठाण यांनी आपल्या मित्रांसह विद्युत महामंडळाला भेट देत निवेदन दिले. यावेळी मोहम्मद इरशाद, फैजान खान, शाहरुख खान, फैजान खतीब, अदनान खान, नदीम पठाण, शे. इमरान, मो रीहान, सोहेल आदीं उपस्थित होते..
Discussion about this post