
सातारा : (अनिलकुमार कदम प्रतिनिधी )
देशाचे माजी कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकनेते खासदार शरद पवार कुटुंबासह पाच दिवसांच्या मुक्कामासाठी महाबळेश्वर येथे परिवारासह दाखल झाले आहेत.सदरचा दोरा व मुक्काम खाजगी स्वरूपात असल्याचे सांगितले जात आहे.
शरद पवार यांचे महाबळेश्वर येथे रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एका खासगी बंगल्याच्या आवारात हेलिपॅड वर आगमन झाले.ते कुटुंबीयांसह आले आहेत.दिनांक सात मार्च पर्यंत विश्रांतीसाठी महाबळेश्वर मुक्कामी असणार आहेत अशी माहिती मिळत आहे.
महाबळेश्वर मुक्कामी अनेक राजकीय क्षेत्रातील मान्यवर विश्रांतीसाठी उन्हाळ्यात येत असतात.राज्यपाल दर वर्षी महाबळेश्वर मुक्कामी येण्याची परंपरा अनेक वर्षापासून आहे.
शिवसेनेचे सेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे महाबळेश्वर येथे विश्रांतीसाठी उन्हाळ्यात येत असत.त्यानंतर आता उध्दव ठाकरे हे सुद्धा विश्रांतीसाठी उन्हाळ्यात महाबळेश्वरला येतात.
यावर्षी तापमानवाढीमुळे उष्णता अधिक वाढली आहे.या पार्श्वभूमीवर देश विदेशातील अनेक नामवंत राजकीय नेते,उद्योगपती, भांडवलदार, सिनेसृष्टीतील कलाकार , क्रीडा सांस्कृतिक साहित्य क्षेत्रातील मान्यवर मंडळी महाबळेश्वरला विश्रांतीसाठी व पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येतील अशी महाबळेश्वर पाचगणी परिसरात लोकांच्या मध्ये चर्चा आहे.
खा शरद पवार कुटुंबासह पाच दिवस महाबळेश्वर येथे खासगी दोरा विश्रांतीसाठी मुक्कामी असल्याने कोणालाही भेटणार नसल्याचे समजते.पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे..
Discussion about this post