रोटरी क्लब अमळनेर तर्फे कृषी उत्पन्न बाजार समितत जनजागृती अभियान अंतर्गत परावर्तक (रिफ्लेक्टर) टेप लावण्यात आले.
दिनांक 04 मार्च
रोटरी क्लब अमळनेर तर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांच्या बैलगाडी, ट्रॅक्टर, मिनी ट्रक, थ्री व्हीलर, सायकल साठी रोड सेफ्टी आणि ट्रॅफिक जनजागृती अभियान अंतर्गत परावर्तक (रिफ्लेक्टर) टेप लावण्यात आले.
रोटरी क्लब अमळनेरच्या वतीने रस्ता सुरक्षा व वाहतूक जनजागृती अंतर्गत एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत कृषी उत्पन्न बाजार समितीकडे येणाऱ्या शेतकऱ्यांच्या बैलगाडी, ट्रॅक्टर आणि मिनी ट्रकवर परावर्तक (रिफ्लेक्टर) टेप लावण्यात आले तसेच सोबत रोटरी इंटरनॅशनल व्हील हा लोगो रेडियम मध्ये तयार करून लावण्यात आला.
विशेष रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर व इतर वाहने लांबून स्पष्ट दिसावीत रस्ते अपघात टाळण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. अनेकदा अपुऱ्या प्रकाशामुळे किंवा वाहनांवर रिफ्लेक्टर टेप नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे निष्पक लोकांचे जीव वाचवण्यासाठी व रस्ते अपघात कमी करण्यासाठी हा महत्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या उपक्रमाद्वारे रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देत ट्रॅक्टर व लहान मालवाहू वाहनांना सुरक्षित प्रवासासाठी मदत केली जाणार आहे. रोटरी क्लब अमळनेरने घेतलेल्या या पुढाकारामुळे शेतकरी बांधवांना सुरक्षिततेबाबत जागरूक राहता येईल आणि भविष्यात होणारे संभाव्य अपघात टाळता येतील. प्रोजेक्ट चेअरमन अजय केले,रौनक संकलेचा, रोटरी सभासद विवेक देशमुख, आशिष चौधरी, भारत बोथरा, वृषभ पारख, योगेश येवले, प्रेसिडेंट ताहा बुकवाला या सर्व्यांनी प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत असून शेतकरी बांधवांनी आपल्या वाहनांना असे रिफ्लेक्टर लावावे असे
आवाहन रोटरी क्लब तर्फे करण्यात येत आहे.
Discussion about this post