
शैलेश मोटघरे,
गोंडऊमरी/रेल्वे :
दरवर्षी चैत्र महिन्यात गुढीपाडव्यापासून परिसरातील झाडांची पानगळ होऊन नवी पालवी फुटत असते आणि वसंत ऋतूचे आगमन होते. मात्र, यंदा चैत्रा ऐवजी फाल्गुन महिन्यातच विविध झाडांची पानगळ होऊन चैत्र पालवी बहरली असल्याचे चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे.
सध्या निसर्गाचा लहरीपणाचा प्रत्यय सर्व गोष्टीत दिसून येत आहे.परिसरात झाडांची पानगळ होऊन झाडांना नवीन पालवी फुटत असल्याने निसर्गाचा लहरीपणाचा प्रत्यय सर्वत्र पहावयास मिळत आहे.अनेक मोठ्या झाडांची पानगळ होऊन त्यांना आताच नव्या पालवीचे रूप प्राप्त झाले असून, अनेक झाडांना छोट्या छोट्या सुवासिक फुलांचा बहर आला आहे. फाल्गुन महिन्यातच चैत्राची चाहूल लागल्याने झाडांना नवीन पालवी येऊ लागली आहे. त्यामुळे सर्वत्र निसर्गाचा अद्भुत नजराणा पहावयास मिळत आहे..
Discussion about this post