शिरूर तालुका प्रतिनिधी :-
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत शिरूर येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. हॉटेल आस्वादजवळ झालेल्या या आंदोलनात “जोडे मारो” आंदोलनाच्या माध्यमातून आरोपींच्या प्रतिमांना जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती संभाजी महाराज की जय!, सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरांना शिक्षा झालीच पाहिजे! अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. आंदोलकांनी या प्रकरणातील सर्व दोषींवर कोणत्याही दबावाशिवाय जलद आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या आंदोलनात या वेळी भारतीय मराठा महासंघाचे श्यामकांत वर्पे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष अर्चना डफळ, संघटक आशा ढवण, माजी अध्यक्षा शशिकला काळे, जनता दलाचे संजय बारवकर, समस्त मराठा समाज संघाचे विश्वस्त व माजी उपसरपंच संभाजीराव कर्डिले, रामभाऊ इंगळे, संजय माशेरे, महेंद्र ढेरे, अखिल भारतीय मराठा महासंघ युवा आघाडीचे राहुल शिंदे, शिरूर विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष आप्पा वर्पे, मुकेश पाचर्णे, भरत ढाके यांसह अनेक मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलकांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, जर लवकरात लवकर आरोपींवर कठोर कारवाई झाली नाही, तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष श्यामकांत वर्पे यांनी दिला.
Discussion about this post