
परभणी येथून गंगाखेड कडे येणारा मालवाहतूक ट्रक खळीपाटी पुलावरून थेट गोदावरी नदीपात्रात कोसळल्याने दोघे जखमी झाल्याची घटना गुरुवारी 6 मार्च रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. तेथे उपस्थित झारेकरानी यांनी वेळीच नदीपात्रात उडी घेऊन दोघांना बाहेर काढल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही.धुळे येथून कापड घेऊन उदगीर कडे जाणारा मालवाहतूक क्रमांक एम एच 18 एम 74 28 हा परभणी गंगाखेड रस्त्यावरील खळीपाटी पुला जवळ येताच स्टेरिंग रॉड तुटल्याने पुलाचे लोखंडी कडे तोडून हा ट्रक थेट गोदावरी नदीपात्रात कोसळला.पुलावरील ट्रक न गोदावरी नदीपात्रात कोसळल्याचे पाहतात येथे असलेल्या झारेकर युसुफ बेग बिबन बेग,अफसर बेग, दत्ता सोळंके आदींनी नदीपात्रात उडी मारून पाण्यातील ट्रक केबिनमध्ये अडकलेल्या शोएब खान गफार खान वय तीस वर्षे या ट्रक चालकाला व जुबेर अब्दुल रहमान मणियार वय अठरा वर्षे दोघे राहणार धुळे यांना बाहेर काढले.तर खळी येथील उत्तम रंगनाथराव पवार यांनी दोन्ही जखमींना दुचाकीवरून गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्पना घुगे परिचारिका प्रणिता शिंदे, गोविंद वडजे आदींनी त्यांच्यावर प्रथम उपचार करून विष्णू ,होरे रावण भालेराव, किरण कौसे, गोविंद ठाकूर, दिगंबर कदम आदींच्या मदतीने पुढील उपचारासाठी दोन्ही जखमींना परभणी येथे हलविले . खळीपाटी पुलावरून थेट गोदावरी नदीपात्रात ट्रक कोसळल्याची माहिती समजतात पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे पोलीस उपनिरीक्षक विशाल बुधोडकर ,खळी येथील पोलीस पाटील पुंडलिक सुरवसे यांच्यासह तहसीलदार उषाकिरण शृंगारे नायब तहसीलदार सुनील कांबळे आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली..
प्रतिनिधी राजेश्वर वट्टमवार…9767475002
Discussion about this post