सोनगीर — नूतन माध्यमिक विद्यालय नुकताच विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते डॉ.सी.व्ही.रमण यांचा सन्मान दिवस म्हणून राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला.
या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे शिक्षक जी.एस.कुवर हे होते व त्यांच्या हस्ते सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा त्यांना विज्ञानाची गोळी लागावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून या नूतन विद्यालयात विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक डी.पी. माळी यांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यात विद्यालयातील इयत्ता पाचवी ते नववी या वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला या मेळाव्यात 20 विद्यार्थी विद्यार्थिनींनी प्रयोग/ उपकरणे मांडले होते या.
विज्ञान मेळाव्यात परिसरातील सहज उपलब्ध होणारे साहित्य जसे की पाण्याची बॉटल,काही पेपर,दोरा सोलर सेल,बॅटरी अशा साहित्यांद्वारे विद्यार्थ्यांनी अनेक संकल्पना स्पष्ट होण्यासाठी छोट्या-छोट्या प्रयोगाचे उपकरणे यांचे सादरीकरण करण्यात आले. मेळाव्यात जल शुद्धीकरण,कारखान्यातून निघणारा धूर,ज्वालामुखी,इलेक्ट्रॉनिक गेम,छोटे छोटे घरगुती कुलर,हायड्रोलिक पूल,शेतात गवत कापणारे कटर,पवन ऊर्जा, सौरऊर्जेच्या साह्याने शेतीला पाणी देणारे यंत्र, इत्यादी साहित्य/उपकरणे सादर करण्यात आले.
या मेळाव्याच्या आयोजन शाळेतील विज्ञान शिक्षक एस.सी.महाजन,व्ही.डी.शिरसाठ,पी.सी.धनगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
स्वामी संतोष माळी सौर ऊर्जेच्या साह्याने शेती यंत्र यांना प्रोत्साहनपर प्रथम बक्षीस देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे मुख्याध्यापक डी.पी.माळी,
शिक्षक एस.पी.एंडाईत,ए.डी.पाटील,बी.ए.माळी,एस.सी. महाजन,व्ही.डी.शिरसाठ,के.एल.ठाकरे,पी.सी.धनगर,व्ही.आर.
माळी,डी.डी.सोनवणे,जी.एस.कुवर, महेंद्र मनोहर माळी,तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.ए.माळी,यांनी केले तर आभार व्ही.डी.शिरसाठ यांनी मानले.
Discussion about this post