
डोणगाव..
सध्या शासनाच्या वतीने रस्ता दुरुस्ती व नवीन रस्त्यांना प्राधान्य देण्यात येत असले तरी हे रस्ता विकास की भकास असे म्हणण्याची पाळी डोणगाव परीसरातील लोकांवर आली असून लोक सोशल मिडीयावर याबाबत संताप व्यक्त करीत आहेत. डोणगाव येथून रिसोड जाण्यासाठी आरेगाव मार्ग जवळचा रस्ता आहे व या रस्त्याचे काम सुरू होऊन दोन वर्षे झाली तरी केवळ कंत्राटदाराने पुर्वीचा खड्डेमय डांबर रस्ता खोदून ठेवला. तेव्हा पासून ह्या रस्त्याकडे डुंकून ही न पाहील्याने या कच्चा रस्त्यावरून जायचे कसे असा प्रश्न निर्माण होत आहे.तर याच मार्गावर क्रृषी उत्पन्न बाजार समिती व संत गजानन महाराज मंदिर व शाळा आहेत. त्यामुळे हजारो नागरिकांना या रस्त्यावरून जाणे येणे करावे लागते. सदर रस्ता कच्चा असल्याने या परीसरातील लोकांना धुळीचे आजार बळावत असल्याने सदर रस्त्याची चौकशी त्वरित चौकशी करून रस्ता काम करावे अशी मागणी होत आहे. (डोणगाव ते जवळा. हा ही रस्ता खड्डेमय झाला असून या रस्त्यावर निक्रृष्ठ दर्जोचे परत ज्याठिकाणी खड्डे आहेत.त्या ठिकाणी डांबर टाकले जात आहे.याकडे ही लक्ष देणे गरजेचे आहे.तर डोणगांव ते लोणी गवळी रस्त्यावर ही खड्डे पडले आहेत.त्यामुळे वाहन धारक त्रस्त झाले आहे.त्यामुळे शासनाने सदर रस्त्यावर परत डांबरीकरण करणे आवश्यक आहे..
Discussion about this post