
उदगीर/ कमलाकर मुळे :
जन्म आणि मृत्यू हे आयुष्याचे दोन टोक आहेत. पुनर्जन्म किंवा अस्तित्व ही मृत्यूने लावलेला शोध आहे जगणं समृद्ध असेल तर मृत्यू चांगला येतो. वर्तमानाच्या अशा वेदनांची मर्म जीवनातील सुख दुःख आणि मृत्यू यांच्यातला संवाद पुनर्स्थापित केले. तर आयुष्यावरच प्रेममाणसाला जगण्याची प्रेरणा देत खरे आयुष्य जगण्यासाठीचा आदर्श पाठ घालून देणारी साहित्य कृती म्हणजे इंटीमेट डेथ ही होय.असे मत अर्चना मुळे सांगली,यांनी व्यक्त केले. श्रुतिका बिपिन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या उपक्रमाअंतर्गत च्या महिला दिन विशेष 332 वाचक संवादामध्ये सांगली येथील सुप्रसिद्ध समुपदेशक अर्चना मुळे यांनी डॉक्टर मारी डी हेनेझेल लिखित इंटीमेट डेथ या साहित्यकृतीवर सुंदर असा संवाद साधताना त्या म्हणाल्या की ,मृत्यू हे एक फार मोठे रहस्य आहे. मृत्यूमुळेच आयुष्याला मोल येतं. मृत्यूला नाकारल्या पेक्षा त्याला जीवनाचा एक भाग बनवला पाहिजे. कारण मरणासन्न व्यक्ती आपल्या वेदना, निराशा सहवासातील व्यक्तीकडे व्यक्त करतो. या पुस्तकात लेखकाने वर्तमान पुन्हा सादर करून आमच्या जाणिवेतून निसटलेल्या विषयांच्या आणि काळांच्या दूरवरच्या कक्षा ,वेदनां निराश.या पुस्तकात लेखकाने वर्तमान पुन्हा सादर करून आमच्या जाणिवेतून निसटलेल्या विषयाच्या आणि काळाच्या दुरवरच्या कक्षा ,वेदना,आणि त्यांचे मर्म दुसऱ्यांची दुःख जीवन आणि मृत्यू यांच्यातला निरंतर संवाद यासाठी वर्तमान पुणा सांगण्याचा याबरोबरच मरणासन्न रुग्णाशी कोण ठेवलेला संवाद या पुस्तकातून सादर केलेला आहे..
Discussion about this post