
उदगीर/ कमलाकर मुळे :
भाजी मार्केटमधील असलेल्या पोलीस मदत केंद्रावर भाजीपाला तरकारी विक्रेत्यांनी ताबा मिळवला असून, भाजीपाला विक्रेतेच मदत केंद्र चालवत असल्याचे चित्र आहे. भाजीपाला मार्केटमधील रस्त्यावर उच्छाद माजवणाऱ्यांना हातगाडी ठेलेवाले विक्रेत्यांनी शिस्त लावण्यासाठी शहर पोलिसांनी चौकी उभी केली. तिथे पोलीस कर्मचारी असतानाही तेथे भाजीविक्रेत्याकडून पोलीस चौकीवर ताबा मिळवल्याचे पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. हा अजब प्रकार मागील अनेक दिवसापासून सुरू असल्याचे परिसरातील व्यापारी नागरिकाकडून बोलले जात आहे .भाजी मार्केटमध्ये असलेल्या चौकीचा फक्त दरवाजाच नावाला मोकळा असल्याचे दिसत आहे ,तर दुसरीकडे अनेक वेळा पोलिसांकडून हात गाडीवाले भाजीविक्रेत्यांना सांगूनही ते ऐकत नसल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलीस मदत केंद्रावर भाजीपाला विक्रेत्यांनी ताबा मिळवल्याने पोलिसाचा अभय अर्थपूर्ण आहे का ? शहर पोलीस ठाण्याच्या वतीने दोन होमगार्डची तिथे नियुक्ती केली आहे. परंतु बिचारे होमगार्डचे कोणीच ऐकत नसल्याचे होमगार्ड कडून सांगण्यात येत आहे..
Discussion about this post