
शिराळा / प्रतिनिधी..
शिराळा शहर विकासाच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आमदार सत्यजित देशमुख, माजी आमदार मानसिंगराव नाईक, तसेच सम्राट महाडिक विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिराळा शहराच्या समस्या सोडविण्यासंदर्भात ठोस कृती कार्यक्रम आखावा, अशी मागणी करण्यात आली. स्वागत प्रशांत देशमुख यांनी केले.
शहरातील विविध विकास कामासंदर्भात नगरपंचायत सभागृहामध्ये विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नगरपंचायत प्रशासक नितीन गाढवे यांच्यासोबत बैठक पार पडली. यावेळी ही मागणी करण्यात आली.
शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढणे, पोलीस चौकीची सुरू करणे, पार्किंगव्यवस्था निर्माण करणे, शिराळा शहर विकासासाठी विविध योजना व कृती कार्यक्रम आखणे याचबरोबर अंबामाता मंदिर शेजारील कंपाउंड बांधकाम सुनिश्चित करणे अशा विविध मागण्यासंदर्भात नगरपंचायत कार्यालयास सर्वपक्षीय कृती समिती व सामाजिक कार्यकर्त्यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी माजी सरपंच देवेंद्र पाटील, प्रमोद नाईक, विश्वास कदम, सम्राट शिंदे, अजय जाधव, प्रा. सम्राट शिंदे यांनी विविध प्रश्न संदर्भात मते व्यक्त केली. यावेळी मुख्याधिकारी नितीन गाढवे यांनी सर्व समस्या सोडवण्यासंदर्भात कृती कार्यक्रम आखला जाईल याची ग्वाही दिली.
निवेदनावर प्रतापराव पाटील, केदार नलवडे, चंद्रकांत निकम, गजानन सोनटक्के, अमित गायकवाड, गौतम पोटे, बसवेश्वर शेटे, सुनील कवठेकर, लालासाहेब शिंदे, सचिन शेटे, कुलदीप निकम, निलेश आवटे, बाबासो गायकवाड, लालासाहेब तांबीट,दीपक पवार, मोहन जिरंगे, शशीकांत देशमुख, धर्मेंद्र आलेकर आर्दीच्या सह्या आहेत. यावेळी कार्यालयीन अधीक्षक डी. व्ही. गोसावी यांनी आभार मानले..
Discussion about this post