
: कृषी आणि दुग्ध व्यवसायाला चालना देणारा देवेंद्र कृषी महोत्सव व डेअरी एक्सपो 2025 आज मोठ्या उत्साहात फुलंब्री येथे पार पडला. या भव्य महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री माननीय रावसाहेब दानवे पाटील व भाजपा प्रदेश महामंत्री श्री. संजयकुमार केणेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.शेती आणि पशुपालन व्यवसायात नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्या दृष्टीने या एक्सपोमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बी-बियाणे, अत्याधुनिक शेती उपकरणे आणि डेअरी उद्योगासंदर्भातील माहिती देण्यात आली. या प्रसंगी आयोजक जिल्हाध्यक्ष श्री. सुहास शिरसाठ, श्री. राधाकिशन पठाडे, सौ. पुष्पाताई काळे, सौ. रेखाताई कुलकर्णी, सौ. ऐश्वर्याताई गाडेकर, श्री. बद्रीनाथ राठोड, श्री. अशोक दादा गरुड, श्री. पाथरीकर सर, श्री. दीपक खोतकर, श्री. मंगलाताई वाहेगावकर, श्री. जितेंद्र जयस्वाल, श्री. ज्ञानेश्वर मोठे, श्री. राजू तुपे, श्री. राणीताई सोनवणे, श्री. रवी कथार यांसह अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकरी आणि उद्योजकांना एकत्र आणत कृषी क्षेत्रातील नवीन संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विविध तज्ज्ञांच्या कार्यशाळा आणि माहितीपर सत्रांमुळे उपस्थितांना व्यवसायवाढीच्या संधींची नवीन दृष्टी मिळाली.कृषी व दुग्ध व्यवसायास चालना देणाऱ्या या महोत्सवाला शेतकरी वर्गाने भरभरून प्रतिसाद दिला. या उपक्रमामुळे शेतकरी अधिक सक्षम होतील आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला..
Discussion about this post