
शिराळा / प्रतिनीधी -:
महाराष्ट्र शासनाचा यशवंत पंचायत राज अभियानाचा पुणे विभागातून राज्यात शिराळा पंचायत समितीचा द्वितीय क्रमांक मिळाला हे तालुक्याच्या दृष्टीने भूषणावळ असून पुढील वर्षी प्रथम क्रमांक मिळण्यासाठी अधिकारी कर्मचारी व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी हातात घालून काम केले तर निश्चितपणे यश मिळेल असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे माजी सदस्य रणधीर नाईक यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या यशवंत पंचायतराज अभियानामध्ये पुणे विभागातून शिराळा पंचायत समितीचा दुसरा क्रमांक मिळाल्या बद्दल गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी नाईक बोलत होते.
नाईक पुढे म्हणाले, पंचायत समितिच्या सर्व विभागातील कामकाजाचे मूल्यमापन करून यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत ही निवड केली जाते. यामध्ये शिराळा पंचायत समितीने खूप सुंदर काम केले असून शिराळा पंचायत समितीचे मागील चार वर्षाचे कामकाज अतिशय लोकाभिमुख पद्धतीने सुरू असून पंचायत समितीचे सर्व कार्यालय प्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांचे यामध्ये फार मोठे मोलाचे सहकार्य लाभल्यामुळे आज पंचायत समितीच्या लौकिक वाढत आहे, यापुढील काळात ही तालुक्यातील पदाधिकारी, नेते मंडळी व अधिकारी, कर्मचारी यांनी हातात हात घालून काम केले तर पुढील वर्षाचा महाराष्ट्र शासनाच्या यशवंत पंचायत राज अभियाना अंतर्गत शिराळा पंचायत समितीला प्रथम क्रमांक मिळण्यासाठी निश्चितपणे यश मिळेल.
यावेळी पाणीपुरवठा विभागाचे डेपो इंजि शालिग्राम साळुंखे, विस्ताराधिकारी मनोज जाधव, कांदे सरपंच रोहित शिवजातक, उपसरपंच संपतराव पाटील सदस्य गजानन पाटील, धनाजी पाटील, अमोल पाटील, माधवराव मोहरेकर,नवनाथ कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते..
Discussion about this post