

दिशादर्शक = नाथाभाऊ शिंदे पाटील
सारथी महाराष्ट्राचा नेवासा तालुका प्रतिनिधी-श्री नाथाभाऊ शिंदे पाटील
वार्तांकन = राज्यातील व नेवासा तालुक्यातील शेत रस्ता समस्याग्रस्त शेतकऱ्यांना स्वतः साठी न्याय हक्काचा रस्ता मिळून देण्यासाठी व अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शेत व शिव पानंद चळवळ ही पारनेर तालुक्यातील नारायणगाव येथील श्री शरद राव पवळे चळवळीचे प्रणेते व अध्यक्ष यांनी सुरू केलेल्या महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद चळवळीच्या कार्यक्रम दोन गेल्या दोन वर्षापासून चालू केले आहे. त्यातच श्रीगोंदा येथील दादासाहेब जंगले पाटील यांनी राज्य समन्वयक म्हणून व्हाट्सअप चा ग्रुप माध्यमातून व प्रत्यक्ष कार्यक्रम आयोजित करून राज्यभर नाशिक जळगाव परभणी अहमदनगर या ठिकाणी जाऊन जिल्हाधिकारी पोलीस निरीक्षक व व्हिडिओ यांना संपर्क करून व मेळावे घेऊन शेतकऱ्यांना जागृत करीत आहोत.
नेवासा तालुक्यामध्ये महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व तिसऱ्या गुरुवारी तहसील कार्यालयामध्ये जनन्याय दिन आयोजित केला जातो. नुकताच दिनांक 6 मार्च 2025 रोजी या जनन्याय दिना मधून नेवासा तहसील कार्यालयाचे तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार, नायब तहसीलदार किशोर सानप, नायब तहसीलदार (संजय गांधी योजना) श्री संदीप चिंतामणी साहेब रोजगार हमी योजना अव्वल कारकून श्री एस डी कुलकर्णी लिपिक श्री उमाप यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व प्रत्यक्ष प्रकरणे हाताळली 143 व ५/२ ही रस्ता प्रकरणे नेवासा तालुक्यात पेंडिंग राहणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल असे यावेळी डॉक्टर संजय बिरादार यांनी सांगितले त्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यालयातील कर्मचारी श्री झिने यांनी महाराष्ट्र राज्य शेत व शिवपालन चळवळ समिती
जनन्याय दिन चा फलक तहसील कार्यालय मध्ये लावला
सर्व समस्याग्रस्त शेतकऱ्यांनी शेत तिथे रस्ता गाव तेथे समृद्धी असा असे असलेल्या टोप्या डोक्यावर परिधान करून डाक बंगला शासकीय विश्रामगृह नेवासा मधून मीटिंग आयोजित करून तहसील कार्यालयात जनन्याय साठी प्रवेश केला.
या जनन्यायदिनातून उप अधीक्षक भूमी अभिलेख
श्री संदीप गोसावी साहेब यांनी प्रत्येक महिन्याला तीन शिवरस्ते विनाशुल्क व मोफत खुले करून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचा आढावा घेण्यासाठी कार्यालयातील श्री रगडे यांना या जनन्या दिनासाठी उपस्थित केले होते.
जनन्याय दिना वेळी तालुक्यातील निंभारी अमळनेर
सुरेगाव गंगा बेल पांढरी शिवरस्ता, तामसवाडी धनगरवाडी शिवरस्ता या रस्त्यांच्या शिव हद्दी खुणा दाखविण्याचा कार्यक्रम जाहीर केला. शिव हद्द खुणा दाखविण्याचे वेळी पोलीस संरक्षण पोलीस बंदोबस्त मोफत विनाशुल्क पुरविला जाईल असे तहसीलदार बिरादार साहेब यांनी सांगितले. तसेच माननीय पी आय धनंजय जाधव साहेब यांनी सुद्धा मी पोलीस बंदोबस्त मोफत देईल असे आश्वासन दिले.
या जन न्याय दिनाचे वेळी कुकाण्याचे डॉक्टर बाबासाहेब कोलते, पत्रकार सुनील भाऊ गर्जे महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद चळवळीचे उपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे पाटील, श्री सागर सोनटक्के, बाळासाहेब थोरात विठ्ठल करमड. संभाजी पवार प्रवीण पवार, मिनीनाथ घाडगे पाराजी गुडदे अशोकराव गागरे पानेगाव जानकर रुपनर साहेबराव आखाडे कुशाबा फुल सौंदर हरिभाऊ तुवर रमेश भक्त, सोमनाथ माकोणे रामभाऊ पवार, मुरलीधरजरे सुनील वाघ, शिवाजी लहारे, अक्षय कांगुणे कानिफनाथ कदम गोरक्ष कातोरे व तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
पुढील जन्यादिन महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी म्हणजे 20 मार्च रोजी होईल असे तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार यांनी जाहीर केले. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या जनन्याय दिनाचा लाभ घ्यावा असेही आवाहन केले..
Discussion about this post