


प्रतिनिधी : सचिन कोयरे..
क्षय रोग निर्मूलनासाठी राबविण्यात येणाऱ्या 100 डेज टीबी मोहिम अंतर्गत अकोला बाजार येथे दिनांक 28 फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांच्या हस्ते जागरूकता रॅलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्ये देत नागरिकांना क्षय रोगाविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली.
या रॅलीत विद्यार्थ्यांनी "टीबी हद्दपार – भारत सशक्त", "क्षणभराची तपासणी, आयुष्यभराची सुटणी" यांसारख्या घोषणांच्या माध्यमातून जनजागृती केली. यावेळी विद्यार्थ्यांसह नागरिकांना क्षय रोगाच्या लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि मोफत उपचार योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
अकोला बाजार आरोग्य उपकेंद्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी टीबी आजाराची लक्षणे,याची वेळेत तपासणी आणि उपचारांचे महत्त्व यावर माहिती दिली.तसेच टीबी पूर्ण बरा होतो, फक्त सातत्याने उपचार घ्यावेत असा संदेश नागरिकांना देण्यात आला.या उपक्रमात स्थानिक आरोग्य केंद्र, शाळा प्रशासन, विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. यासाठी आरोग्य उपकेंद्राचे अधिकारी डॉ माधव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली.
Discussion about this post