
रेठरेधरण मैदान 📍
राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके देवाभाऊ यांच्या सन्मानार्थ आमदार श्री.सदाभाऊ खोत यांनी ‘देवेंद्र फडणवीस केसरी’ या बैलगाडा शर्यतीचे रेठरेधरण येथे आयोजन केले होते.
रयत क्रांती पुरस्कृत या शर्यतीचे हे दुसरे पर्व अगदी थाटात आणि भव्य पद्धतीने संपन्न झाले. या ओपन मैदानात कॅबिनेट मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब, शिराळ्याचे आमदार श्री. सत्यजितभाऊ देशमुख, भाजपा नेते श्री.सम्राटबाबा महाडीक आदी अनेक मान्यवरांच्या समवेत शर्यतीचा रोमांच अनुभवला.
मान्यवरांचे स्वागत केले. आदरणीय बावनकुळे साहेबांनी झेंडा दाखवून शर्यतीच्या थराराला सुरुवात झाली. आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या जयघोषात ही रोमांचक शर्यत संपन्न झाली. विजेत्यांचे अभिनंदन केले. असंख्य शर्यतप्रेमींनी ही शर्यत यशस्वी केली.
या यशस्वी आयोजनाबाबत आमदार श्री. सदाभाऊ खोत आणि रयत क्रांतीच्या पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
Discussion about this post