रामटेक मतदारसंघातील उमेदवार आणि विद्यमान राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्याविरोधात कट्टर बंड पुकारणारे डॉ. राजेश ठाकरे यांची भाजपमध्ये घरवापसी झाली. भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्या उपस्थितीत मनसर येथे झालेल्या कार्यक्रमात ठाकरे यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करीत भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला.शिंदेसेना विदर्भात ऑपरेशन टायगर राबवित असताना भाजपने रामटेक मतदारसंघात निलंबित नेत्यांना पक्षात परत घेत जयस्वाल यांनाही धक्का दिला आहे.
Discussion about this post