तालुका प्रतिनिधी – समीर बल्की
चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वरोरा येथील रत्नमाला चौक येथे दि. १० मार्चला १२ वाजता चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. दि. १ मार्च २०२१ नंतर डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विज जोडणी करा, मुख्यमंत्री यांनी निवडणुकीत दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करा, मागील वर्षीचा कपाशी वरील पीक विमा तसेच चालू वर्षातील खरीप हंगामातील पीक विमा शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्याबाबत.
नाफेडची सोयाबीन खरेदी मुदत वाढविण्यात यावी तसेच भावामधील तफावत म्हणून शेतकरी यांना प्रति क्विंटल ५००/-रूपये बोनस म्हणून देण्याचे करावे, सन २०२४-२५ मधील पूर्ण हंगाम होईपर्यंत सीसीआय ची कापूस खरेदी सुरू ठेवण्याबाबत, गरजू शेतकरी यांना तात्काळ नवीन विज जोडणीसाठी डिमांड देण्यात यावे, आदि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेवून १० मार्चला वरोरा येथील रत्नमाला चौक येथे शेतकरी नेते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
Discussion about this post