
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे..
मानोरा : पश्चिम विदर्भ आंध आदिवासी महिला विकास संघ द्वारा आयोजित जागतिक महिला दिन व सोमा डोमा आंध जयंती सोहळा कार्यक्रमाचे आयोजन मानोरा तालुक्यातील गिरोली कोलार येथिल गोपाल मंगल कार्यालय येथे दि. ९ मार्च २०२५ रोज रविवारला सकाळी ठीक ११ः०० वाजता करण्याचे ठरविले आहे.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ. नंदिनीताई राजेश टारपे , जेष्ठ समाजसेविका बुलढाणा हे राहतील.
तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ . शितलताई राजेश ढगे, साहित्यीक तथा संस्थापक आदिवासी विचार मंच (म.रा.) डॉ. ललीता विठ्ठलराव पवार , (बि.ए.एल.एल.बी. एल.एल.एल. महिला कार्यदेविषयक तज्ञ. हे राहतील.
सदर कार्यक्रमातील विषय आंध आदिवासी महिला संघटन सक्षमीकरण करणे, व सोमा डोमा आंध जयंती साजरी करून उपस्थित महिलांना आदिवासी सामाजिक दृष्ट्या प्रबोधन करणे यासह अनेक विषयीचे प्रबोधन करण्यात येईल.
सदर कार्यक्रमाचे प्रस्तावना सौ. पुष्पाताई कळंबे हे करतील सुत्र संचलन सौ. मंगलाताई ढगे हे करतील व आभार सौ. ठाकरे हे मानतील.
वरील कार्यक्रम हा पश्चिम विदर्भामध्ये प्रथमच वाशिम जिल्ह्यातील तसेच मानोरा तालुक्यातील गिरोली कोलार येथे होत असून .
सदर कार्यक्रमाला पश्चिम विदर्भातील सर्व आदिवासी महिलांनी उपस्थित राहून प्रबोधन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सौ. मंगलाताई ढगे (अध्यक्षा राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद मंगरूळपीर व सौ. सुनिता वाघमारे म. कार्यकर्त्या यांनी केले आहे..
Discussion about this post