
पिंपळगाव रेणुकाई, भोकरदन तालुक्यातील..
पिंपळगाव येथे अजून ग्रामीण भागामध्ये महिलांना जागतिक महिला दिनाच्या माहिती नसल्याने अजूनही महिला मोठ्या प्रमाणात कष्ट करत असलेल्या दिसून येत आहे. उदरनिर्वाहसाठी दररोज कष्ट करावे लागते. आमच्यासाठी प्रत्येक दिवस सारखाच असल्याचे शारदा सोळुंके यांनी सांगितले.
८ मार्च रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो. मात्र गोरगरीब महिला अजूनही मोठ्या प्रमाणात कष्ट करत असल्याने दिसून येत आहे. या महिलांना अजून कुठल्याही प्रकारचे सुविधा नसल्याने या महिला अजूनही शासनाने दिलेल्या लाभापासून वंचित असल्याने या महिलांना कोणता जागतिक महिला दिन ही माहीत नाही कधी असते ही माहीत नाही. या महिलांना गेल्या ३५ वर्षांपासून पिंपळगाव रेणुकाई येथे वास्तव्यास आहे. मात्र मतदान यादीतही सुद्धा नाव नाही. शासनाने दिलेल्या रेशन कार्ड नाही, लाडकी बहीण योजनेची ही पैसे नाही. कुठल्याही पगार नाही. शाळेत जाण्यासाठी मुलांना कुठलेही व्यवस्था नाही. त्यामुळे या गरीब कुटुंबाकडे शासनाने लक्ष देऊन यांना शासनाचा लाभ देण्यात यावा अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.
पिंपळगाव रेणुकाई :
हातोडा मारतानी शारदा सोळुंके व तिचे वडील हिरामण सोळुंके.
(छाया : रमेश जगताप)
आम्ही गेल्या ३५ वर्षापासून पिंपळगाव रेणुकाई येथे उदारनिर्वाह करीत आहे.
परंतु अद्यापपर्यंत आम्हाला शासनाने कुठल्याही प्रकारचा लाभ दिला नाही. जागतिक महिला दिन काय असतो हे आम्हाला माहिती नाही यामुळे शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन मदत करावी.
- शारदा सोळुंके, महिला..
Discussion about this post