स्त्री शक्ती म्हणजे संपूर्ण विश्वाची मार्गदर्शक , प्रथम गुरु, पालन पोषण कर्ती, प्रेम वासल्यमूर्ती, प्रेरणास्थान, आशास्थान, बलस्थान त्याग मूर्ती.
आयुष्यामध्ये विविध भूमिका अचूकपणे चोखंदळपणे तन मन लावून पार पाडणाऱ्या शक्तीला
त्रिवार साष्टांग दंडवत प्रणाम.
खरे म्हणजे संपूर्ण महिलांचे संपूर्ण विश्वावर अनंत न फिटणारे उपकार आहेत हे सर्वांनी आवर्जून लक्षात ठेवावे.
संपूर्ण स्त्रियांचा सर्वांनीच नेहमीच आदर सन्मान करावा असे मला प्रामाणिकपणे मनापासून वाटते.
आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त संपूर्ण महिलांना प्रेरणा, प्रोत्साहन मिळावं, तसेच सकारात्मक दृष्टिकोन मिळावा यासाठी माझ्या काही ओळी संपूर्ण महिलांच्या चरणी अर्पित करतो.
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
🌱आजच्या स्त्रीने आदर्श व्हावे🌱
आजच्या स्त्रीचे असे वागणे असावे !
तिच्यासमोर मी अलगद झुकावे !!
आजच्या स्त्रीचे असे कर्तव्य असावे !
तिच्यासमोर मी नतमस्तक व्हावे !!
आजच्या स्त्री कडून असे योगदान असावे !
तिचे माझ्यासमोर आदर्श घडावे !!
आजच्या स्त्रीचे असे स्वप्न असावे !
तिच्या स्वप्नात इतरांचे कल्याण व्हावे !!
आजच्या स्त्रीची महती प्रत्येकाने गावी !
मी त्यामध्ये सर्वात समोर असावे !
आजच्या स्त्रीने मा जिजाऊ व्हावे !
मी तिचा बाळ शिवबा बनावे !!
आजच्या स्त्रीने माई सावित्री व्हावे !
मी तिचा सर्व गुणसंपन्न पुत्र व्हावे !!
आजच्या स्त्रीने माई भिमाई व्हावे !
मी तिचा लाडला भिवा व्हावे !
आजच्या स्त्रीने माझी माय व्हावे !
मी तिच्या पोटी पुन्हा जन्मास यावे !!
🌷🙏🌻🙏🌼🙏🌹🙏🌸🙏🌷
प्रा. समाधान अनुसया मोहन मोरे
विश्वालया , पुष्पक नगर नवी मुंबई
9768310820
🌊🎇⭐🌈🎂❤️🌳🌿🍀🌲🌊
Discussion about this post