डोणगाव येथून जवळच असलेल्या ग्राम शेलगाव देशमुख येथील उपसरपंच विनोद हरीभाऊ गोरे यांच्या वर शेलगाव देशमुख येथील अशोक आनंदराव म्हस्के व इतर 9 ग्रामपंचायत सदस्य यांनी 5 मार्च रोजी तहसीलदार मेहकर यांच्या कडे अविश्वास ठराव दाखल केला होता. यावर मेहकर तहसीलदार यांनी दाखल नोटीसची तपासणी केली असता तसेच ग्रामपंचायत अधिकारी शेलगाव देशमुख यांचा अहवाल व 4/10/2023 रोजी चे ग्रामपंचायत शेलगाव देशमुख येथील सभेचे इतिवृत्त यांची तपासणी केली असता. ग्रामपंचायत सरपंच यांची निवडणूक 4/10/2023 ला झालेली असून त्याचा कालावधी 17 झाला असल्याचे दिसून येते. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनीयम 1958 चे कलम 35(1)/35(2) नुसार महाराष्ट्र शासनाचे राजपत्र असाधारण भाग 4दि.5मार्चे 2020 नुसार सन 1959 अधिनीयम क्र. 3च्या कलम 35 ची सुधारणा कलम 6चा पोटकलम ख नुसार सरपंचाच्या किंवा उपसरपंचाच्या निवडणूकीच्या दिनांकापासून दोन वर्षोच्या कालावधी च्या आत आणी ग्रामपंचायतीची मुदत समाप्त होणाऱ्या दिनांकाच्या लगत पुर्वीच्या सहा महीन्याच्या आत असा कोणताही अविश्वास प्रस्ताव सादर करता येणार नाही. त्यामुळे विशेष सभेचे आयोजन करता येणार नाही. त्यामुळे सदर अविश्वास ठराव अर्ज खारीज करण्यात येत आहे असे पत्रच तहसीलदार निलेश मडके यांनी दि. 6 मार्च ला दिल्याने शेलगाव देशमुख येथील उपसरपंच विनोद हरीभाऊ गोरे यांच्या वरील अविश्वास प्रस्ताव बारगळला आहे. – – – – – – – – – – कायद्याचा अभ्यास नसणारे सदस्य गावाचा विकास कसा करणार ? शेलगाव देशमुख येथील 10 ग्रामपंचायत सदस्य यांनी कायद्याचा अभ्यास न करता उपसरपंच यांचेवर अविश्वास प्रस्ताव सादर केला पण तो कायद्यात टिकू न शकल्याने. हेच गावकारभारी गावाचा काय विकास करणार ? अशी खमंग चर्चा ऐकायला मिळत होती..
Discussion about this post