छत्रपती संभाजी नगर :-
राजे चौक, गणेश नगर येथील भागात राजयोग अबॅकस क्लास चा नूतनीकरण सोहळा पार पडला.
यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यामध्ये परमपूजनीय माऊलीजी दुसाने, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ एस.पी. जवळकर,रमेश वाहूल गायक, बी.बी.टाकळकर तलाठी, ज्ञानेश्वर तांबे पत्रकार, संचालक योगेश काथार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
क्लास मधील सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, त्यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले सुरुवातीस एस पी जवळकर सरांनी क्लासला शुभेच्छा देत नवीन वस्तूमध्ये आपला क्लास जोरदार चालेल व आपण दोघे दांपत्य जी मेहनत घेतात त्याचे नक्कीच वटृक्षामध्ये बदल होणार अशी बोलून त्यांनी भाषण संपले. त्यानंतर माऊलीजींनी आपल्या मनोगत बोलताना सांगितले की आजची शिक्षण पद्धती खूप वेगळ्या पद्धतीने असून त्यामध्ये जर वैदिक शिक्षण पद्धतीचा वापर केला तर नक्कीच विद्यार्थ्यांची जडणघडण चांगली होईल माऊलीजींनी पालकांना मोलाचा सल्ला दिला तुम्ही पालकांना सांगितले की तुम्ही स्वतः व्यसन सोडा व तुमच्या पाल्यांना घडवा नक्कीच त्यांच्या परिवर्तन घडेल आज हा योगायोग आहे की आपण सर्व इथे एकत्र आला आहात आणि राजयोग नक्कीच एका उंचीवर आपल्या पाल्याला नेऊन ठेवेल माऊलीजींनी एवढे बोलून क्लासला खूप खूप शुभेच्छा दिल्या.
सोबतच पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते, प्रमुख सहकार्य श्रावणी टाक, वाय एस पाटील सर, प्रेम साळवे, पंचशीला बनकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश काथार तर आभार प्रदर्शन राजयोग अबॅकस च्या संचालिका योगिता काथार यांनी केले.
ऑफलाइन व ऑनलाईन क्लास साठी संपर्क
राजयोग प्रोऍक्टिव्ह अबॅकस -8552832591/8805497097
Discussion about this post