
तेजस्विनी बहुउद्देशीय सामाजिक व ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी कार्य केले जाते. त्याच बरोबर तेजस्विनी सायकलिंग क्लब
,तेजस्विनी ट्रेकर्स टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून समाजातील सर्व सामान्य महिलांना स्वावलंबी बणविण्याचा प्रयत्न केला जातो. अंगणवाडीत शिक्षिका ते यशस्वी
खेळाडू असा प्रवास करणारी
नीता पंढरीनाथ गंगावणे ही महिला पदव्युत्तर शिक्षणाने संपन्न आहे.
जिजामाता कन्या खाराकुवा शाळेत असल्यापासून त्यांना खेळ व महिला क्षेत्रात कार्य करण्याची आवड होती. नावाजलेली बास्केट बॉल खेळाडू म्हणून त्यांची कारकीर्द यशस्वी ठरली. गिर्यारोहणाची आवड जोपासत महिलांनाही त्यांनी ट्रेकिंगचे धडे व सवय लावली. यातील अनेक स्पर्धा गाजवल्या. सायकलींगचेही त्यांना वेड आहे. .या सर्व आवडी जोपासत कुटुंबा साठी वेळ देत या “स्मार्ट” आजी नातवंडांमध्येही रमतात.
स्वतः तंदुरुस्त राहत इतरांनाही प्रेरित करत त्यांनी आपल्या मैत्रिणींना इतर महिला मुलींच्या फिटनेससाठी जनजागृती केली. त्यासाठी ट्रेकिंग, आणि सायकलिंगला चालना देत तेजस्विनी सायकलिंग क्लबच्या माध्यमातून ग्रुप रायडिंग सुरू केली. यामुळे महिला व मुलींची सायकलिंगकडे ओढ वाढली..त्या एकटीने सायकलवर पंढरपूरवारी करणाऱ्या पन्नाशीपुढील येथील एकमेव महिला आहेत.
छत्रपती संभाजीनगर नव्हे तर इतर जिल्ह्यातील नागरिकांसाठी त्यांनी सायकलिंग चॅलेंज आयोजित केली.
सायकल चालवणे हा एक निरोगी व्यायाम आहे. सायकल चालवल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्याला अनेक फायदे होतात.
वजन कमी करण्यास मदत होते.
सहनशक्ती वाढते,सामर्थ्य सुधारते
कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते,मानसिक आरोग्य सुधारते
पोटाची चरबी कमी होते,हृदयासाठी ते फायदेशीर असून मधुमेह असलेल्या लोकांच्या मृत्यूचे प्रमाण यामुळे कमी होते.
मेंदू आणि हृदयाचे कार्य चक्र उत्तम चालते.
सायकल चालवण्यामुळे चरबी कमी होते, पाय मजबूत होतात – नीता गंगावणे, अध्यक्ष
तेजस्विनी सायकलिंग क्लब
छत्रपती संभाजीनगर..
Discussion about this post