
जागतिक महिला दिन विशेष :
तू जिजाऊ, तु सावित्री, अहिलेची तु लेक आहे,
तु कल्पना, तु सुनीता, आकाशात तुझी झेप आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी आठ मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवशी आपण महिलांचा आदर, त्यांचे हक्क आणि त्यांचे सक्षमीकरण याबद्दल बोलतो. महिला दिनाचा मुख्य उद्देश समाजात महिलांबद्दल जागरूकता पसरवणे आणि त्यांचे योगदान ओळखणे हा आहे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देत आहेत. शिक्षण असो, विज्ञान असो, राजकारण असो की क्रीडा असो, उद्योग-व्यवसाय असो, उद्योजकता असो, सर्वत्र महिला आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. आपण महिलांचा आदर केला पाहिजे आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात समान संधी दिली पाहिजे. या महिला दिनी आपण महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्याची आणि समाजात महिलांप्रती समानतेची भावना पसरवण्याची शपथ घेतली पाहिजे. समान आणि समृद्ध समाजाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन या दिशेने काम केले पाहिजे.आदरणीय प्राचार्य, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करत आहोत. हा दिवस दरवर्षी ८मार्च रोजी महिलांचा सन्मान, अधिकार आणि सक्षमीकरणासाठी साजरा केला जातो.
महिलांना समान हक्क आणि सन्मान देण्याच्या उद्देशाने १९ व्या शतकात याची सुरुवात झाली. आज हा दिवस महिलांचा संघर्ष, त्यांचे कर्तृत्व आणि त्यांच्या हक्कांबद्दल जागरुकता पसरवण्याचे माध्यम बनले आहे. महिलांना सन्मान आणि समानता मिळवून देणे हा महिला दिनाचा मुख्य उद्देश आहे. महिलांची महत्त्वाची भूमिका ओळखून त्यांच्या योगदानाचे कौतुक करण्याची गरज आहे. शिक्षण, विज्ञान, राजकारण, क्रीडा, कला, व्यवसाय अशा प्रत्येक क्षेत्रात आज महिला आपल्या यशाची पताका फडकवत आहेत.
जगभरातील लोक गेल्या शतकभरापासून ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करतात. लैंगिक विषमता आणि भेदभावाबद्दल जागरुकता वाढवताना महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठीचा आणि तो साजरा करण्यासाठीचा हा जागतिक दिवस आहे.
पण हा दिवस इतका महत्त्वाचा का आहे ?
आंतरराष्ट्रीय महिला दिन (IWD) हा कामगार महिलांच्या हक्कांसाठी झालेल्या चळवळीतून निर्माण झाला.
१९०८ मध्ये १५००० महिलांनी कामाचे तास कमी व्हावेत, चांगलं वेतन मिळावं आणि मतदानाचा हक्क मिळावा या मागण्यांसाठी न्यूयॉर्क शहरात एक मोर्चा काढला होता.वर्षभरानंतर अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीनं लगेचच पुढच्या वर्षी हा दिवस ‘राष्ट्रीय महिला दिन’ म्हणून घोषित केला.
त्यानंतर क्लारा झेटकिन यांनी १९१० मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात केली. क्लारा झेटकिन या जर्मन कम्युनिस्ट आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या होत्या.या दिवसाला एक आंतरराष्ट्रीय सोहळा बनवण्याची कल्पना त्यांची होती.आंतरराष्ट्रीय महिला दिन हा ८मार्च रोजीच का?१९१० मध्ये कोपेनहेगन येथे झालेल्या कामगार महिलांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत (इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ वर्किंग वुमेन) त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
या परिषदेत उपस्थित असलेल्या १७देशांतील १०० महिलांनी एकमतानं त्यांना जोरदार पाठिंबा दिला.ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंड मध्ये १९११ मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला.१९१७ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघानं देखील त्याला अधिकृत मान्यता दिली. १९११ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघानं स्वीकारलेली पहिली थीम ही ‘भूतकाळाचं सेलिब्रेशन,भविष्याचं नियोजन’ अशी होती.
आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठी क्लारा झेटकिन यांची मूळ कल्पना कोणत्याही एका विशिष्ट दिवसाशी संबंधित नव्हती.
१९१७मध्ये युद्धकालीन संपात रशियन स्त्रियांनी “ब्रेड आणि शांती” ची मागणी केल्यानंतर ८मार्च या तारीखेची निवड करण्यात आली.संपाच्या चार दिवसांनंतर झारला सत्ता सोडावी लागली आणि तात्पुरत्या सरकारनं महिलांना मतदानाचा अधिकार दिला.
त्यावेळी रशियात वापरात असलेल्या ज्युलियन कॅलेंडरनुसार २३ फेब्रुवारीपासून महिलांचा संप सुरू झाला. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये ती तारीख ८ मार्च आहे.आंतरराष्ट्रीय महिला दिन हा अनेक देशांमध्ये राष्ट्रीय सुटीचा दिवस असतो. चीनमध्ये स्टेट काऊन्सिलच्या सल्ल्यानुसार अनेक महिलांना अर्ध्या दिवसाची सुटी दिली जाते.
जगभरात मोर्चे, चर्चा, मैफिली, प्रदर्शनं आणि वादविवाद असे हजारो कार्यक्रम होतात.
२०२४ मध्ये फ्रान्समध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी फ्रान्सच्या राज्यघटनेत गर्भपाताचे अधिकार समाविष्ट करण्यात आले होते.इटलीमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाला “फेस्टा डेला डोना” म्हणतात. तिथं या दिवशी “मिमोसा ब्लॉसम” ही लोकप्रिय फुलं भेट म्हणून दिली जातात.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या वेबसाइटनुसार जांभळा, हिरवा आणि पांढरा हे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे रंग आहेत.
त्यात म्हटलं आहे की, “जांभळा रंग न्याय आणि प्रतिष्ठेचं प्रतिक आहे, हिरवा रंग आशेचं प्रतीक आहे तर पांढरा रंग शुद्धतेचं प्रतिनिधित्व करतो.”
या रंगांचा वापर १९०३ मध्ये ब्रिटनमधील महिलांच्या मतांसाठी लढण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या वुमन्स सोशल अँड पॉलिटिकल युनियन (डब्ल्यूएसपीयू) या गटानं केला होता.२०२५ साठी संयुक्त राष्ट्रांची थीम “सर्व महिला आणि मुलींसाठी हक्क, समानता, सबलीकरण” ही आहे. याचं उद्दीष्ट पुढील पिढीला शाश्वत बदलासाठी सक्षम करणं हे आहे. आजही काही महिला सुरक्षित नाहीत,
या निमित्ताने आपण महिलांचा सन्मान करू आणि त्यांना समान हक्क आणि संधी देण्यासाठी काम करू, अशी शपथ घेतली पाहिजे. महिला या केवळ घरापुरत्या मर्यादित नसून त्या शिक्षिका, डॉक्टर, शास्त्रज्ञ, नेते आणि उद्योजकही आहेत. त्यांच्या क्षमता समजून घेऊन त्यांना साथ दिली पाहिजे कारण त्यांच्याशिवाय समाज अपूर्ण आहे. महिला सक्षमीकरण ही प्रगतीशील समाजाची ओळख आहे.जर आपण आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरणाविषयी बोललो, तर महिलांना त्यांच्या हक्कांसाठी आधी स्वत:शीच लढावे लागेल, जेणेकरून त्या जगाशी लढताना बळकट होऊ शकतील. पहिला आणि सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे आत्मविश्वास वाढवून आत्मसन्मान मिळवणे. महिलांनी त्यांचे महत्त्व समजून घेऊन स्वत:ची काळजी घेऊन त्यांचा सन्मान वाढवला पाहिजे. आत्म-सन्मान विकसित करताना, आपल्या आंतरिक शक्तीला सकारात्मक विचारांनी सजवणे महत्वाचे आहे. जेव्हा महिलांना सशक्त आणि सन्माननीय वाटेल, तेव्हाच त्या समाजात त्यांची ओळख योग्य पद्धतीने प्रस्थापित करू शकतील..
श्री. निवृत्ती दाभाडे (सहशिक्षक)
सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तळणी ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर..
Discussion about this post