
निलेश सोनोने,
ग्रामीण प्रतिनिधी पातुर..
आलेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या सावरगाव येथील येत्या काही दिवसापासून माकडाची धुमाकूळ घालत आहे त्यामुळे ग्रामस्थ हेरान झाले आहे. माकडाचा मोठ्या संख्येने धुमाकूळ घातल्याने अनेक घरावरील टीन पत्रे व घरगुती वस्तूची तोडफोड झालेली आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला शेत शिवार व जंगल परिसरामध्ये माकडांना काही खायला मिळत नसल्याने माकडाचे कळपाचे कळप गाव वस्ती कडे मोर्चा वळविल्याने गावामध्ये माकड येऊन धुमाकूळ घालत असल्याने ग्रामस्थ हैराण झालेले आहे. डिश टीव्ही एंटीना व घरावरील तीन पत्रे तसे घरावर धान्य वाळू आधी घातल्यास माकडे नुकसान करीत आहे.माकडाच्या धिंगाण्यामुळे ग्रामस्थांना नुकसानीला समोर जावे लागत आहे असे हे चित्र सांगत आहे. शिवाय माकडाला ग्रामस्थांकडून हकलण्याचा प्रयत्न केला असता माकडे अंगावर धाव घेत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तिचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे माकडाच्या बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे याकडे वन विभागाने तत्काळ लक्ष देण्याची गरज असल्याची दिसून येत आहे.
जानू राठोड.
तंटामुक्ती अध्यक्ष
तथा ग्रामपंचायत सदस्य सावरगाव.
गेल्या काही दिवसापासून माकडाचे कळपाचे कळप घरावर धिंगाणा घालत असल्याने घरावरील अनेक टीन पत्रे फुटत आहे त्यामुळे संबंधित विभागाने माकडाचा बंदोबस्त करावा अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही..
Discussion about this post