
चिखलीत महिला दिन उत्साहात; महिलांचा सन्मान व आरोग्य जागरूकता अभियान..!
चिखली (ता. कागल) प्रतिनिधी तानाजी परमणे दि. ०८-मार्च २०२५
– चिखली इंग्लिश स्कूल आणि ग्रामपंचायत चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात आला तसेच आरोग्यविषयक जनजागृती उपक्रम राबवण्यात आला.
कार्यक्रमात श्रीमती बाळाबाई मगदूम, सौ. प्रमोदिनी भोसले, सौ. सुजाता देवर्षी, सौ. मंगल तुकान, सौ. गीता पोतदार (सुपरवायझर प्रा. आ. केंद्र चिखली), डॉ. पूनम मगदूम आणि सौ. जयश्री गळतगे (उपसरपंच चिखली) या महिलांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
विद्यार्थिनींनी ओव्यांच्या गायनातून आणि मनोगतातून स्त्रीशक्तीचा गौरव केला. अरुंधती खोंद्रे, अनुष्का पाटील, तुमन्ना नदाफ, स्वराकोरडे, शर्वरी कुंभार, श्रावणी कोरडे आणि सिद्धी कुंभार यांनी आपल्या प्रभावी सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. विद्यालयाच्या शिक्षिका एम. बी. किरूळकर यांनीही प्रेरणादायी विचार मांडले.
एचपीव्ही लसीकरणाविषयी जनजागृती करण्यासाठी स्टेला सायमन रॉड्रिक्स यांनी मार्गदर्शन केले. ९ ते २६ वर्षे वयोगटातील मुलींना ही लस कशी उपयुक्त ठरते आणि ती कॅन्सरपासून कशी बचाव करू शकते, याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
डॉ. पूनम मगदूम यांनी संतुलित आहार आणि महिलांच्या आरोग्याच्या महत्त्वावर भर दिला. सौ. साधना जाधव यांनी आईविषयीच्या भावना व्यक्त करत उपस्थितांना भावूक केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. बाळाबाई मगदूम व सौ. जयश्री गळतगे यांनी महिलांना आत्मनिर्भरतेचा संदेश दिला आणि महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सौ. गीता पोतदार यांनी एचपीव्ही लसीकरणाच्या कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली
कार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंच श्री. युवराज कुंभार, माजी सरपंच श्री. अल्लाबक्ष सय्यद व सौ. छाया चव्हाण, ग्रामसेवक श्री. सूर्यकांत कुंभार, सौ. सुब्रा मुल्ला, सौ. रेश्मा नाईक, सौ. आशा कस्तुरे, अजिंक्य मुरगुडे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी *विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. एस. एस. बोरवडेकर यांनी केले. पाहुण्यांची ओळख कु. डी. एम. कुंभार यांनी करून दिली. सूत्रसंचालन कु. पी. पी. पाटील यांनी तर आभार श्री. यू. एस. कुंभार यांनी मानले.
महिला सशक्तीकरण आणि आरोग्यविषयक जनजागृतीचा संदेश देणारा हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. चिखली इंग्लिश स्कूल आणि ग्रामपंचायतीच्या या संयुक्त उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Discussion about this post