
गोंडपिपरी पोलीस परीसरात पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय बातमीदार यांचे कडुन गोपनीय माहीती मिळाली कि पांढ-या रंगाची महींद्रा xuv ७०० क्रमांक एम.एच.३३.ए.सी.४२४२ या वाहनामध्ये वढोली मार्गे गोंडपिपरी कडे दोन आरोपी वाहनामध्ये अवैद्यरित्या देशी दारू बाळगुन वाहतुक करीत आहे अशा माहिती वरून नाकेबंदी करून वाहन ताब्यात घेतले.
वाहन चालक राकेश शीव मशीद (२९) रा. गौरीपूर ता. चामोर्शि जि. गडचिरोली व चंद्रय्या भुमय्या गड्डमवार (५८ ) रा. कुरूड ता. चामोर्शि जि.
गडचिरोली यांना ताब्यात घेऊन पांढ-या रंगाची महींद्रा xuv ७०० क्रमांक एम.एच ३३.ए.सी.४२४२ ची पाहणी केली असता वाहनामध्ये ५० खाकी खरड्याचे बॉक्समध्ये प्रत्येक बॉक्समध्ये प्रत्येकी १०० नग ९० एम. एल. नी भरलेल्या ज्यावर रॉकेट देशी दारू संत्रा B.NO. 513 FEB 2025 असा लेबल असलेल्या एकुण ५००० नग प्लास्टीक कंपनी सिलबंद बॉटल किंमत १ लाख ७५ हजार रुपये तसेच वाहन महींद्रा xuv ७०० कर्माक एम.एच ३३.ए. सी. ४२४२ किंमत अंदाजे १५ लाख रुपये असा एकुण १६ लाख ७५ रुपये चा मुद्देमाल जप्त केले.आरोपी विरूद्ध पोलीस ठाणे गोंडपिपरी येथे अप.क. ३७ /२०२५ कलम ६५ (अ) (ई) ८३ मदाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जांबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे, गोंडपिपरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मंगेश कराडे, पो.अ.अतुल तोडासे, पो.अं. प्रशांत नैताम, पो.अं. तिरूपती गोडसेलवार, पो. अं. रतनसिंग चव्हाण, सैनिक रियाज शेख यांनी केले.
७ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेने अवैध बनावट दारू ची वाहतूक होताना ३०० पेटी दारू पकडली होती तर ३ मार्च मार्च रोजी गोंडपिपरी पोलीसांनी १४ लाख रुपयाचा दारूसाठा जप्त केले होते..
Discussion about this post