
ता.प्र.मारोती काळेकर…
नांदगाव खंडेश्वर येथील खंडेश्वर मंदिर पुरातन काळातील मंदीर असुन शासनाच्या तिर्थक्षेत्र ब दर्जातील उर्वरीत विकास निधीमधून विद्यमान. आमदार प्रतापदादा अडसड यांना सोबत घेऊन खंडेश्वर संस्थानच्या सर्वतोपरी विकास करण्याच्या प्रयत्न करु असे प्रतिपादन खा. श्री अमरभाऊ काळे यांनी केले.ते महाशिवरात्री निमित्त आयोजित समारोपीय कार्यक्रमात बोलत होते खंडेश्वर संस्थान हे 750 वर्षा पूर्वीचे पुरातन काळातील हेमाडपंथी असून महाशिवरात्री निमित्त लाखो भाविक दर्शनासाठी मंदिरात येतात.सात दीवस शिवमहापुरान कथा भंजन पुजा प्रबोधनात्मक भारुड आणि धार्मिक कार्यक्रम आयोजीत केले जातात.महाशिवरात्रीच्या दिवशी हरी भक्त परायन श्री उमेशजी महाराज जाधव यांचे काल्याचे किर्ती झाले यावेळी वर्धा जिल्हा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री.अमरभाऊ काळे यांनी मंदीरातसभेट दिली.दरम्यान खंडेश्वर मंदिर हे जागृत शिवालय असुन या मंदिराचा उर्वरीत विकास थानीक सर्व पक्षीय कार्यकर्ते व लोक प्रतिनिधीना सोबत घेऊन परीपुन प्रयत्न करु व संस्थांचा विकास कसा करुन घेता येईल यावर येत्या काळात लक्ष देऊ असेही खा. अमरभाऊ काळे यांनी म्हतले यावेळी उपस्थित मान्यवर मुख्य अधिकारी निवृत्त भालकर श्री. प्रकाशदादा मारोटकर श्री. राजेश पाठक माजी नगराध्यक्ष श्री. अक्षयभाऊ पारसकर काँग्रेसचे अध्यक्ष अमोलभाऊ धवसे मोहंमद साजीदभाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री. सचिनभाऊ रिठे श्री. बाळासाहेब राणे वासुदेवराव लोखंड विवेकभाऊ व राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
Discussion about this post