
प्रशांत पाटील / अहिल्यानगर संपादक –
अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री दुर्गादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक
विद्यालय येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य आदम शेख महिला शिक्षिका वर्षा शेळके,हर्षा जायभाये,सरविन पटेल,गायत्री पवळ यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ,अहिल्यादेवी होळकर ,सावित्रीबाई फुले,इंदिरा गांधी यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले.
विद्यालयाचे प्राचार्य आदम शेख यांच्या हस्ते विद्यालयातील महिला शिक्षिकांचा जागतिक महिला दिनानिमित्त शाल ,श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शालेय विद्यार्थिनीं कुमारी वैष्णवी चौधरी, श्रुती व्यवहारे यांनी महिला दिनाचे महत्त्व, इतिहास महिलांच्या हक्काविषयी आणि त्यांच्या कर्तृत्व विषयी मुक्तपणे विचार ठेवून मनोगत व्यक्त केले. विद्यालयाचे प्राचार्य आदम शेख यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले स्त्री ही त्याग, प्रेरणा ,नम्रता, श्रद्धा यांची मूर्ती आहे. ती कोणत्याच बाबतीत कमी नाही. स्त्री अधिक संवेदनशील, श्रद्धावंत आहे तिच्यात देवत्वाचे अस्तित्व जाणवते. स्त्रिया विविध क्षेत्रांमध्ये आपले कर्तृत्व गाजवत आहेत. सामाजिक ,शैक्षणिक राजकीय , धार्मिक , संरक्षण पत्रकारिता, फायर ब्रिगेड या क्षेत्रात महिलां उल्लेखनिय कार्य करत आहेत असे मार्मिक विचार व्यक्त केले. तसेच वर्षा शेळके संजय दळवी, अजित सांगळे.यांनी महिला दिनानिमित्त राजमाता जिजाऊ ,आहिल्यादेवी होळकर ,सावित्रीबाई फुले,इंदिरा गांधी ,कल्पना चावला ,किरण बेदी कर्तुत्वान महिला विषयी माहिती देवून महिला सक्षमीकरणावर आपले विचार व्यक्त केले. यावेळी,विद्यालयाचे प्राचार्य आदम शेख,संजय दळवी ,संतोष व्यवहारे ,सहादू भोंडवे, राहुल झावरे,अजित सांगळे,अमोल ठाणगे,भगवान राऊत,सुभाष अडसुळ, राहुल नवले, तुकाराम हराळ ,संदिप खिलारी , अरविंद कुमावत , सुनिल व्यवहारे, वर्षा शेळके, हर्षा जायभाये, गायत्री पवळ , सरवीन पटेल ,वसतीगृह अधिक्षक सुळे शब्बीर शेख ,राम चौरे,यमाजी झेंडे, फारुख शेख, विश्वनाथ चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय दळवी यांनी तर आभार प्रदर्शन सरविन पटेल यांनी केले..
Discussion about this post