परभणी शहरातील जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीजवळील चौकात असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याशेजारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ११ फूट उंच पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. या पुतळ्याचे लोकार्पण मंत्री अतुल सावे, पालकमंत्री मेघना बोर्डीकर, ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रविवारी (दि. ९) करण्यात आले.

Discussion about this post