
अजिंक्य भारत प्रतिनिधी..
डोणगाव :-
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर दहा किलोमीटर पर्यंत शेती व्यवसायाशी संबंधित मोठे बोधचिन्ह उभारण्यात यावे.मुंबई नागपूर नागपूर मुंबई समृद्धी मार्गावर प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांच्या वतीने मुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. समृद्धी महामार्गावर स्वतंत्र दक्षता पथके व चौक्या उभारण्यात याव्यात हा भार पोलीस स्टेशनवर न टाकता आपले खात्यामार्फत ही यंत्रणा उभारण्यात यावी जेणेकरून होणारे अपघात टाळता येतील. या समृद्धी महामार्गावरील अपघाताचे प्रमाण पाहता हा मार्ग नकोसा वाटत आहे. परंतु या मार्गाचे फायदे तितकेच आहेत.अपघाताला रोखण्याकरता समृद्धी महामार्गावरील पोलीस स्टेशन हे त्यांचे कामाचे व्याप्तीने फारसा न्याय देऊ शकत नाही. याकरिता खात्यामार्फत स्वतंत्र दक्षता पथके अथवा पोलीस स्टेशन प्रमाणेच चौक्या निर्माण करण्यात याव्या.जेणेकरून अपघात टाळल्या जातील. समृद्धी महामार्गावर वसूल होणारा टोल नाका यामधून हा खर्च फारसा होणार नाही. व प्रवाशांनाही सोय होईल. समृद्धी महामार्गावर नाशिकच्या जवळपास ज्याप्रमाणे शेतीसंबंधी बोधचिन्हे उभारण्यात आली.बैलजोडी बैलबंडी नांगर अशा प्रकारची बोधचिन्हे या 800 किलोमीटर मध्ये दहा किलोमीटर मागे एक असे उभारावे जेणेकरून महाराष्ट्राची अस्मिता शेतकऱ्यांची प्रतिष्व व भरदार वेगाने चालणाऱ्या गाड्यांचे चालकांना विरंगळा मिळून अपघात होण्यास अडथळा होईल. आमच्या मागण्या आपण लवकरात लवकर पूर्ण करून समृद्धी महामार्गावरील प्रवाशांना न्याय द्यावा व जीवदान द्यावे.
अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे..
Discussion about this post