
अकोला महानगरपालिका यांची हद्द वाढ झाली तेव्हा पासून मुलभुत सुविधा पासून कायम वंचित असुन,सफाई कामगार, कायम गायब,डासनिर्मुलन कसे असते हे स्थानिक जनता अनभिज्ञ, पाणी साठा प्रचंड प्रमाणात उपल्बध असून देखील अत्यल्प पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पंधरा दिवसातुन एक वेळा(पाणी पुरवठा 1/2″ पाईप मधून 40 मिनीट 400 लिटर)ईलेक्ट्रिक मोटर शिवाय पाणी मिळणे अशक्य,स्थानिक जनता एवढ्याने हैरान नसुन प्रभागात लाईट व्यवस्था उपलब्धता नसल्या सारखीच,मोकाट कुत्रे(श्वानांचा हैदोस)तसेच घरकुल वाटपात भेदभाव,अतिक्रमणा कडे कायम दुर्लक्ष. या प्रभागातील जनता कायम दुर्लक्षितच असुन,अकोला महानगरपालिके द्वारा जसा बळजबरीने कर जमा केला जातो ,तसा विकास का नाही ? अशी कायम स्थानिक जनतेची मागणी आहे..
Discussion about this post