

सप्तशृंग गड :
नांदुरी ते सप्तशृंगी गड
असा दहा किलोमीटरचा रस्ता कोट्यावधी रुपये खर्च करून रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण सुरू आहे. परंतु या रस्त्याच्या कामामुळे दर्शनाला येणाऱ्या भाविकांना व दर्शन करून परतीच्या प्रवास करणाऱ्या भाविकांनाही घाटात तासान तास वाहने उभे करून त्यांना ताटकळत थांबवे लागत आहे.
घाटात अरुंद रस्ता असल्याने एका बाजूने सिमेंट काँक्रिटीकरणारा थर असल्याने एकच बाजू सुरू असल्याने भाविकांचे येणारे व जाणारे वाहने एकाच ठिकाणी आल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे.
या रस्त्याच्या कामामुळे ज्या ठिकाणाहून वाहतूक वळविली आहे. त्या ठिकाणाहून दोन रस्ते व झाडेझुडपे असल्यामुळे भाविकांना रात्रीच्या वेळेस कुठल्या रस्त्याने जायचे असा प्रश्न पडत आहे. या ठिकाणी ठेकेदाराने कोणतेही दिशादर्शक फलक न लावल्याने वाहन चालकांचा गोंधळ उडताना दिसत आहे, आणी धुळीमुळे प्रवाशांना व चालकाला समोरचे वाहन दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे या
ठिकाणी ठेकेदाराने एका बाजूकडील वाहने थांबवून ठेवून व दुसरी उभे असलेली वाहने थोडे थोडे सोडण्यात यावी असे केल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
परंतु या ठिकाणी ठेकेदाराने कुठलाही कामगार नसल्याने भाविकांना उन्हाचा तडाखा सहन करत वाहनातून उतरून वाहतूक कोंडी दूर करावी लागत आहे..
Discussion about this post