10 Total Views , 1 views today

बोर्लीपंचतन ( प्रतिनिधी )
श्रीवर्धन मतदार संघातील दस्तुरखुद्द श्रीवर्धन नगरीतील चिखलप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी, श्रीवर्धन पंचायत समितीच्या सभापतीपदी, जिल्हा परिषद सदस्य तसेच शिवसेना तालुकाप्रमुख पदी, विद्यमान भाजपाच्या जिल्हा सरचिटणीस, श्रीवर्धन विधानसभा प्रमुख, जिल्हा नियोजन अशी एक ना अनेक पदांची बिरुदावली भुषवणारे आणि श्रीवर्धन तालुक्यातील फर्ड्या वक्त्यांमध्ये ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते ते डॅशिंग व्यक्तिमत्व प्रशांतजी शिंदे उर्फ बंड्या भाई.
८ ऑगस्ट १९७० रोजी प्रशांतजी शिंदे यांचा जन्म आणि लहानपणापासून आवेशपूर्ण बोलणे, पहाडी आवाज यामुळे प्रशांतजी समोरच्या व्यक्तीला जिंकुन घेत आपापल्या प्रत्येक क्षेत्रात ठसा उमटवला. राजकारणाची आवड निर्माण झाली असताना चिखलप ग्रामपंचायतीचा सदस्य, सरपंच पासुन त्यांनी राजकारणात सुरुवात केली ती श्रीवर्धन पंचायत समितीच्या सभापती, श्रीवर्धन शिवसेना तालुकाप्रमुख, जिल्हा परिषद सदस्य ते आजपर्यंत अखंड राजकारणात असुन श्रीवर्धन विधानसभा प्रमुख तसेच जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील भाजपाची असणारी घोडदौड पाहता उद्याचा आमदारकीचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्यानेच त्यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला महाराष्ट्राचे भाजपा प्रभारी अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण, पनवेल आमदार प्रशांतजी ठाकूर, खासदार धैर्यशील पाटील साहेब अशी एक ना एक अनेक नामवंत पदाधिकारी उपस्थित होते.
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील भावी आमदारकीचा उमेदवार म्हणून प्रशांतजी शिंदे यांच्याकडे महाराष्ट्र भाजपा प्रभारी अध्यक्ष तथा माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रायगड जिल्हा माजी पालकमंत्री म्हणून आमदार रविंद्रजी चव्हाण यांची करडी नजर असल्याने या विवाह प्रसंगी दिसून येत असल्याचे दिसत आहे.
या श्रीवर्धन मतदार संघातील तमाम जनतेची मागणी आहे की स्थानिक पातळीवरील उमेदवार असावा. तसे पाहिले तर महाराष्ट्रात भाजपाची सत्ता असल्याने अनेक भाजपाच्या मंत्र्यांकडून तसेच पनवेलचे आमदार प्रशांतजी ठाकूर यांच्या माध्यमातून श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यातील बहुतांश गाव वाडी वस्तीत प्रशांतजी शिंदे यांनी थोड्या प्रमाणात विकासाची कामे आणि पदाधिकारी, कार्यकर्ते यांना बळ दिल्याने, प्रत्येकांच्या सुखदुःखात, लग्न समारंभात यांची आवर्जून भेट देत असल्याने या मतदारसंघात भाजपाची ताकद दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येत आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील एक डॅशिंग नेतृत्व म्हणून प्रशांतजी शिंदे यांच्याकडे पाहिले जाते. श्रीवर्धन पंचायत समिती, प्रशासकीय इमारत उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन, तहसीलदार श्रीवर्धन कार्यालय, भूमी अभिलेख, सार्वजनिक बांधकाम खाते, वन खाते, कृषी विभाग तसेच महत्त्वाचे म्हणजे उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला जी असेल ती मदत करण्यासाठी काही माणसं असल्याचीही माहिती दिसून येत आहे यामध्ये प्रशांतजी शिंदे यांचा अधिकाऱ्यावर व प्रशासनावर असलेली पकड पाहता जनतेच्या मनात प्रशांत शिंदे यांच्या बद्दल एक वेगळीच ओढ निर्माण झालेली दिसून येत असल्याने भाजपाच्या वतीने त्यांना परिपूर्ण सहकार्य केले जात आहे..
Discussion about this post