
या घटनेचा सविस्तर आढावा घेतला आहे. आमचे अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी प्रशांत सोनवणे यांनी चला पाहुयात सविस्तर माहिती अशी कि, अहिल्यानगर मधील पाथर्डी शहरात मस्साजोग येथील सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी. व याच घटनेतील फरार आरोपी कृष्णा आंधळे याला तातडीने अटक करावी वा सर्व आरोपीची संपत्ती जप्त करावी यासाठी सर्वपक्षीय पाथर्डी बंद ची हाक देण्यात आली. त्या संदर्भात सर्वपक्षीय कार्यकर्ते तथा जिल्हापरिषद सदस्य राहुल दादा राजळे,विष्णुपंत अकोलकर, बंडू पठाडे,नामदेव लबडे, महेश बोरुडे,शुभम गाडे, धनंजय चितळे,बबन सबलस, सोमनाथ अकोलकर,परमेश्वर टकले, भाऊसाहेब धस,डॉ रामदास बर्डे, देवा पवार,राजेंद्र सापते,बापू नरवडे, लाला भाई शेख, उद्धव माने,बंडूशेठ बोरुडे, सचिन वायकर आदींनी तहसीलदार उद्धव नाईक यांना निवेदन दिले,,, तरी मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांना निर्घृण हत्या करताना जे फोटो काढले व्हिडीओ काढले हे मानवतेला अत्यंत काळिमा फासणारे काम केले. त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी असे जिल्हापरिषद सदस्य राहुलदादा राजळे यांनी व्यक्त केले…
Discussion about this post