
डोणगाव.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर टाले यांच्यावर असलेल्या विविध गुन्ह्याच्या संदर्भात दि. 8 मार्च ला डोणगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार अमरनाथ नागरे यांनी ज्ञानेश्वर टाले यांना 1वर्षै कालावधी साठी तडीपार ची नोटीस देत त्यांना बुलढाणा जिल्हा लगतचे जिल्हे सोडून हिंगोली जिल्हामध्ये तडीपार करण्यात आले आहे. ज्ञानेश्वर प्रकाश टाले, वय 35 वर्षे, रा डोणगाव ता.मेहकर जि.बुलडाणा यांच्या विरूद्ध कलम 56(1)(अ) (ब) मुंबई पोलीस कायदा 1951 अन्वये तडीपारीचा प्रस्ताव या उपविभागीय दंडाधिकारी या न्यायालयात प्राप्त झाल्यावरून सदर प्रकरण सुरु करण्यात आले. प्रकरणात मुंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 59 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन सदर प्रकरणात चौकशी अधिकारी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी, मेहकर यांची नियुक्ती करण्यात येऊन प्रकरणात सखोल चौकशी करुन त्यांच्या स्वयंस्पष्ट अहवालासह प्रकरण दोन महिन्याचे कालावधीत मागविण्यात आले होते उपविभागीय पोलीस अधिकारी, मेहकर यांनी त्यांचे पत्र क्रमांक उपविपोआ/मेह/तडीपार अहवाल/टाले 2024-4337 दि.17.12.2024 अन्वये चौकशी अहवाल मुळ प्रकरणासह ह्या कार्यालयास सादर केलेला आहे. सदरच्या शिफारशीच्या अनुषंगाने प्रस्तावित जाब देणार ज्ञानेश्वर प्रकाश टाले , वय – 38 वर्षे, रा.डोणगाव ता. मेहकर जि. बुलडाणा याता दोन वर्षे कालावधीकरिता बुलडाणा जिल्हा व लगतचे वाशिम जिल्हातून तडीपार का करण्यात येवू नये याबाबत त्यांचा लेखी जबाव उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर यांचे कार्यालयाचे पत्र कारणे दाखवा नोटीस नुसार मागविण्यात आला होता. त्यानुसार प्रस्तावित जाब देणार यांनी दिनांक 11/12/2024 रोजी हजर राहून लेखी जबाब सादर केला आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक, बुलडाणा यांनी त्यांच्या उपरोक्त प्रस्तावाला नमुद केले आहे की, प्रस्तावित जाब देणार यांच्याविरुष्ट पोलीस स्टेशन अधिकारी, डोणगाव या ठिकाणी विविध अपराधांखाली गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर यांनी प्रस्तावित केल्यानुसार ज्ञानेश्वर प्रकाश टाले, वय- 38 वर्षे, रा. डोणगाव ता. मेहकर जि. बुलडाणा यांना बुलढाणा जिल्हा व लगतच्या जिल्हयातून एक वर्ष कालावधीकरिता तडीपार करण्यात येत आहे.सदर आदेशाची प्रत ज्ञानेश्वर प्रकाश टाले, वय 38 वर्षे, रा.डोणगाव ता. मेहकर जि. बुलडाणा यांच्यावर बजावल्याच्या दिनांकापासून एक वर्ष कालावधी गणण्यात येईल. हद्दपार इसम यास हद्दपार आदेशाविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 60 अन्वये मा. विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे सदर आदेशाची प्रमाणित प्रत मिळाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसात अपील दाखल करता येईल. तडीपार इसम यांना (बुलढाणा जिल्हा व लगतच्या जिल्हे वगळता) ज्याठिकाणी वास्तव्य करावयाचे असेल त्याठिकाणचा पत्ता पोलीस स्टेशन अधिकारी डोणगाव यांना देणे अनिवार्य राहील. तद्नंतर पोलीस स्टेशन अधिकारी, डोणगाव यांनी तडीपार इसम यास त्यांनी कळविलेल्या (बुलढाणा जिल्हा व लगतचे जिल्हे वगळता) ठिकाणी नेवून सोडतील. तडीपार इसम हा ज्याठिकाणी वास्तव्य करेल त्याठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशनला दर पंधरा दिवसाला एक दिवस तरी हजेरी देणे बंधनकारक राहील. तडीपार इसम यास तडीपार कालावधीत प्रतिबंधात्मक क्षेत्रात संबंधित पोलीस स्टेशन अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही. या अटी व शर्तीचा भंग केल्यास पोलीस स्टेशन अधिकारी, डोणगाव यांनी पुढील नियमाप्रमाणे योग्य ती कार्यवाही करावी.अशा आदेशाची अंमलबजावणी पोलीस स्टेशन अधिकारी डोणगाव यांनी करुन तसा अहवाल या कार्यालयास सादर करावा त्याप्रमाणे दि. 8 मार्च ला ज्ञानेश्वर टाले यांना तडीपार करण्यात आले आहे 6) सर्व संबंधितास कळवा व प्रकरण नस्ती करा. आदेश आजरोजी दिनांक 04/03/2025 माझ्या सही शिक्क्यानिशी पारीत केला आहे. उपविभागीय दंडाधिकारी, मेहकर दीतील डिज कर..
Discussion about this post