
जवळ जवळ 8 वर्ष झालं मी ताईंना ओळखते… त्या एक आदर्श मुख्याध्यापिका असून प्रत्येक सामाजिक कार्यात मोलाचा सहभाग घेऊन खारीचा वाटा उचलतात… त्यांच्या शाळेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात त्या कुठेही कसर ठेवत नाहीत… सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांचे मोलाचे योगदान असते… सतत नवीन गोष्टी शिकणे आणि त्याचा शाळेतील विद्यार्थी पालक तसेच समाजातील लोकांसाठी उपयोग करणे हे त्यांचे काम मनाला खूप भावते… विद्यार्थी घडविण्यासाठी त्यांची धडपड मी नेहमीच पाहते… समाजातील प्रत्येक घटक महत्वपूर्ण असून आपण त्यांच्यासाठी शक्य होईन त्या गोष्टी करण्याची त्यांची सवय आपल्याला सामाजिकतेचे भान याची जाणीव नक्की करून देते.. ताईंच्या घरातून खूप मोठा सपोर्ट त्यांना भेटतो म्हणून त्या कुटुंबापुरते, नोकरीपुरते मर्यादित न राहता समाजहित, राष्ट्रहित जपण्यात अग्रेसर आहेत..त्यांचा शांत स्वभाव, इतरांचे प्रश्न एकूण घेण्याची मानसिकता यातून मला पण बरेच काही शिकण्यासारखे आहे.. नोकरी घर आणि सामाजिक कर्तव्य यामध्ये कुठेही कमी न पडणाऱ्या स्वाती ताई यांच्यातील स्त्री शक्तीला आदरपूर्वक मी मनापासून सलाम करते… आजही आपल्यासारखी लोक समाजहिताचा विचार करणारे आहेत म्हणून बऱ्याच लोकांना समाजाचे देणे काय असते हे समजते…(महिला दिन विशेष संकल्पना मनीषा तरटे)
Discussion about this post