जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्री शिवाजी हायस्कूल डोणगांव च्या आदर्श शिक्षिका स्वर्गीय सौ सुनीता प्रताप आखाडे स्मृति प्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात स्त्री कुंटूबाचा आधार नाही तर समाजाची खरी ताकद आहे असे मत माजी मुख्याध्यापिका सौ वैशाली आंबेकर यांनी व्यक्त केले,
दि 8 मार्च या जागतिक महिला दिनी जिल्हा परिषद प्राथ कन्या शाळेत संजीवनी महिला, तेजस्विनी महिला फाऊंडेशन व शब्दवाणी न्युज चॅनल च्या वतिने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापिका सौ वैशाली आंबेकर तर प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच सौ रेखाताई पांडव,सौ निलोफर कुरेशी, डॉ प्रांजली बाजड,सौ ज्योती बुरखंडे,सौ महेफुजा सैय्यद ,शाळा समिती अध्यक्षा सौ छाया मानवतकर सह विद्यामान ग्रा प सदस्या सौ सलमाबी अतार, सौ नंदा लांभाडे, सौ जयश्री आखाडे,सौ फरजाना शाह,सौ निर्मला बाजड,सौ सौ सुनंदा काळे ,शिक्षीका सौ कविता भुयार,खिराडे,झगडे मॅडम आदि उपस्थित होत्या, सर्वप्रथम दिपप्रज्वलन, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करुन मान्यवर महिलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, प्रास्ताविक मनोगतातून सौ माधुरी फुले यांनी कार्यक्रमाची प्रेरणा, भूमिका व नारीशक्ती वर आपले विचार व्यक्त केले,
यावेळी स्व सुनीताताई आखाडे स्मृति शालेय साहित्य वाटप करून गुणवंत विद्यार्थीनीनां स्मृति चिन्ह देवून सत्कार करण्यात आला, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल शब्दवाणी न्युज चॅनल च्या वतीने माजी मुख्याध्यापिका सौ वैशाली आंबेकर,सौ छाया काळे,सौ वर्षा लांभाडे, श्रीमती कुसुम वाघमारे यांना सावित्रीबाई फुले पुरस्काराने गौरविण्यात आले ,
आपल्या सत्काराला उत्तर देत आपल्या शेक्षणिक, सामाजिक कार्याची हि पावती असून सत्कार व पुरस्कार प्रेरणा देतात असे मत त्यांनी व्यक्त केले,सौ छाया मानवतकर यांनी यावेळी प्रखर असे मत मांडुन महिला जागृत, संघटीत होऊन चुल व मुल पर्यंत मर्यादित न राहता प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर व्हावे,असे आवाहन केले,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षीका अर्चना सुर्यवंशी तर आभार सौ अश्विनी आखाडे यांनी मानले,यशस्वीतेसाठी अंजली ठोसर,सह संजीवनी महिला मंडळ पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले,राष्टगिताने कार्यक्रमाची सांगता झाली,
Discussion about this post