ज्ञानदीप परिवार आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा २०२५ निमित्त सामान्य ज्ञान आयोजित करण्यात आली होती.
यशस्वी आयोजनाचे सहावे वर्ष होते.आपल्या गावातून आणि तालुक्यातून प्रशासनात यशस्वी विद्यार्थी घडावे आणि त्यांना विविध क्षेत्रात करिअरचे उत्कृष्ठ मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने आज संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तळेगांव रोही येथे
*सामान्य ज्ञान परीक्षेचा* निकाल आणि *बक्षीस वितरण आणि गुणगौरव सोहळा* आयोजित करण्यात आला..याप्रसंगी *महिला बालकल्याण विभाग उपायुक्त महाराष्ट्र शासन आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी..तसेच माजी सैनिक आदरणीय रमेश पाटील साहेब आणि ज्ञानदीप परिवाराचे सर्व सदस्य उपस्थित होते…*
याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह,पदक,पुस्तके* असे बक्षिसे देण्यात आली…सूत्र संचालन सन्मा.रमेश आहीरे,सर यांनी केले…आभार प्रदर्शन विद्यालयाचे शिक्षक आद.श्री. काळे सर यांनी केले…
सर्वांचे मनःपूर्वक आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली…गटनिहाय निकाल:लहान गट विजेते..प्रथम तनुजा वाकचौरे,द्वितीय सृष्टी पाटील, तृतीय श्रावणी वाकचौरे,चतुर्थ सायली गांगुर्डे, पंचम ज्ञानेश्वरी महाले आणि उत्तेजनार्थ दर्शन थोरातमोठा गट विजेते :..
प्रथम अनुष्का केदारे,द्वितीय अनुष्का गांगुर्डे,तृतीय ऋतुजा काळे,चतुर्थ यश गरुड,पंचम साक्षी वाकचौरे आणि उत्तेजनार्थ प्रणव ठाकरे
Discussion about this post