

प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी..
पाथरी माळीवाडा येथील संत सावता माळी सभा मंडप जागेचे उद्घाटन माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या हस्ते नारळ वाढवून व माळीवाड्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ वाढवून संपन्न झाले. या कार्यक्रमाला माळीवाडा नामदेव नगर शंकर नगर फुले नगर येथील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रस्ताविक मा.नगर सेवक रंगनाथराव वीरकर यांनी केले यावेळी संत सावता महाराजांचे चरित्रावर विजय विरकर यांनी मनोगत व्यक्त केले.महादू गवारे मोहन पोपळघट यांनीही आपले कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त केले.माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी उपस्थित नागरिक महिला बंधू-भगिनींना सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्हार कसबे यांनी केले. व्यासपीठावर आबासाहेब कोरडे, साहेबराव मानोली कर, सुखदेव काका चिंचाणे नारायणराव पितळे ,डी एन रासवे ज्येष्ठ नागरिक रामराव मानोलीकर रफिक भाई अन्सारी, महादू गवारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माळीवाड्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.आभार प्रदर्शन अमोल बोराटे यांनी केले.
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी..
Discussion about this post