





प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी..
महाराष्ट्र राज्य शासन मान्यता प्राप्त पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्यातील पदधिकारी नेहमी पोलीस विभागातील पोलीस अधिकारी ते पोलीस कर्मचाऱ्यांच्या न्याय व हक्कांसाठी व जेथे कमी तेथे आम्ही या तत्वावर काम करणारी एकमेव समिती आहे. ‘ जागतिक महिला दिना ‘ निमित्त मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशन येथील कर्तव्य दक्ष कार्यरत महिला पोलीस कर्मचाऱ्यांना व पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस अधिकारी ते पोलीस कर्मचाऱ्यांना समितीचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ संघपाल उमरे, कमांडो फोर्स प्रतीक खांडेकर, गोलु उर्कुटकर, पोलीस पाटील विशाल बांते,पोलीस पाटील संजयजी विघ्ने, प्रमोद चवरे आदी च्या प्रमुख उपस्थितीत सन्मान पत्र, पदक देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसंगी मंगरूळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा. गौतमजी इंगळे यांनी व सर्व पोलीस पोलीस कर्मचाऱ्यांनी समितीच्या या उपक्रमाचे खुपच कौतुक केले. समिती नेहमी आमचा मानसिक ताण कमी करण्यासाठी व आमच्या समस्याचे निवारण करण्यासाठी नेहमी आमच्या पाठीशी असते.त्यासाठी सर्वांनी समितीच्या पदधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले व पुढेही असेच सहकार्य राहो हि ठाणेदार व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केली..
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी..
Discussion about this post