
उदगीर /कमलाकर मुळे :
धाराशिव येथील साईराम मंगल कार्यालय, साईराम नगर,बार्शी रोड,धाराशिव या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने मोफत वधुवर पालक मेळावा आयोजित करण्याबाबत रविवार दि.9 रोजी सायंकाळी 5 वाजता मराठा बांधवांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी मार्गदर्शक प्रा अभिमान हंगरगेकर व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा नवनाथ पवार,प्रमूख पाहुणे अशोक गायकवाड,माजी प्राचार्य सुभाष जाधव,अशोक चव्हाण,मा.गटशिक्षणाधिकारी राज तांबे,विष्णू इंगळे,अशोक ठोंबळ यांनी समाजातील मुला मुलींच्या विवाह जुळण्यात येणाऱ्या अडचणीबाबत मार्गदर्शन केले.रमेश भोसले यांनी पालकांनीही आत्मपरिक्षण करावे असेही म्हटले.हा मेळावा रविवार दि.13 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8 वा.स्वयंवर मंगल कार्यालय,जिजाऊ चौक बार्शी नाका धाराशिव येथे येथे घेण्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले.हा मेळावा पूर्णपणे मोफत असून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.असे आयोजक सकल मराठा समाज धाराशिव यानी कळविले आहे.
या प्रसंगी विष्णु इंगळे,मोहन जगदाळे,रावसाहेब भड,तानाजी बिरंजे,अमोल निंबाळकर,अर्जुन जाधव,सुभाष जाधव,पंडित मगर,रमेश गाढवे,प्रकाश पवार,सतिश चव्हाण,अर्जुन साळुंके,दिनेश साळुंके,हरिदास सूर्यवंशी,सतीश माने,शिवाजी इतबारे,बाबू शिंदे, वसंतराव पाटील,सतीश ढेकणे,सोनटक्के अरुण, महादेव भोसले,बाबासाहेब तांबे,अण्णासाहेब कोल्हे, चंद्रकांत भांजी,गौतम घोलप,सतीश पवार,अंकूश पवार,दशरथ थोरात,दत्तात्रय भोसले,अण्णासाहेब कदम,राजू तांबे,अशोक चव्हाण,आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशोक गायकवाड यांनी केले तसेच आभार प्रदर्शन रमेश भोसले यांनी केले..
Discussion about this post