सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक – १०.०३.२०२५
माढा तालुक्यातील कुर्डू येथील आंतरभारती विद्यालयाच्या भाग शाळेत जागतिक महिला दिन साजरा झाला.यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून महाराष्ट्र विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती कविता धावणे मॅडम होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ग्रामोदय समितीचे सचिव प्रकाश भाई शहा आणि प्रमुख उपस्थिती म्हणून ग्रामोदय समितीचे संचालक राहुल शेंडे,अमित साळुंखे,कुर्डूच्या सरपंच वंदना भोसले, उपसरपंच सुप्रिया कापरे हे होते.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले आणि साने गुरुजी यांच्या प्रतिमे चे पूजन करण्यात आले.यावेळी प्रशालेतील विद्यार्थिनींनी कार्यकर्तृत्वन स्त्रियांच्या वेशभूषा सादर केल्या होत्या. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली व या कार्यक्रमा प्रसंगी महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामोदय समितीचे संचालक राहुल शेंडे सर यांच्याकडून 11000 देणगी तसेच कर्मवीर चव्हाण साहेब व उबाळे मॅडम यांच्या 10000 रुपये देणगीतून प्रशालेस पुस्तके भेट देण्यात आली.तसेच 2002 च्या इयत्ता 10 वी बॅचच्या, कुर्डू ग्रामपंचायत आणि इतर मिळालेल्या बक्षीसातून प्रशालेस 42 इंची स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आला.यामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण घेता यावे हा प्रशालेच उद्देश आहे. तसेच कुर्डू गावातील उद्योजक संतोष गाडे यांनी 10000 किंमतीचा साउंड बॉक्स प्रशालेस भेट दिला.
प्रशालेच्या पर्यवेक्षका सुचिता क्षीरसागर मॅडम यांनी प्रशाले तर्फे सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी वरील सर्व मान्यवरांसह आंतरभारती विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.टी. खुणे,वरपे ताई,शेख मॅडम,चंद्रकांत गोंडगिरे,बापू देवकर, उद्योजक भाऊसाहेब गाडे,यांच्यासह महिला,ग्रामस्थ सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमांचे सुत्रसंचलन क्रिडा शिक्षक औंदुबर उबाळे सर यांनी केले तर आभार उबाळे मॅडम यांनी मानले.
Discussion about this post