
शेख मोईन..
किनवट/ प्रतिनिधि..
किनवट :
पवित्र रमजान महिन्याला दि २ मार्च पासून सुरुवात झाली असून या कालावधीमध्ये रोजा (उपवास) हा मुस्लिम बांधवांसाठी विशेष महत्त्व असते. या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधवांकडून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही केले जातात परंतु शहरात नेहमी विज खंडित राहत असल्याने व होणाया वारंवार लोड सेटिंग मुळे नागरिकांना नाहक त्रास होत असल्याने बीज पुरवठा अखंडीत सुरू ठेवण्याकरिता सामजिक कार्यक्रते वतीने दि 10 रोजी उपकार्यकारी अभियंता यांना निवेदनातून मागणी करण्यात आली.एकीकडे मार्च महिन्यामध्ये कडक उष्ण वातावरण असून या कडक वातावरणात लहान मलं महिलावृद्ध व पुरुष हे उपवास करीत असतात तसेच इफ्तार व सहरीच्या वेळी विज पुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना यांचा नाहक त्रास होतो.त्यामुळे नागरिकांची गैरसोय होतेतसेच रात्रीच्या वेळी नमाज पठण करीत असताना विज पुरवठा बराच वेळ खंडित असतो.वारंवार होणाया लोडशेटींगमुळे या पवित्र महिन्यात नागरिकांमध्ये एक नाराजी महावितरण कंपनीच्या विरुद्ध निर्माण होते. त्यामुळे या पवित्र रमजान महिन्यात कोणत्याही प्रकारची लोडसेडिंग टाळावी व अखंड विज पुरवठा सुनिश्चित करावा अशा आशयाची निवेदन शेख मोईन यांनी उप-कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी किनवट यांना देण्यात आले.यावेळी शे साजन,शे जमीर, सय्य्द सिद्दीख, शे चाँद,शे समीर उपस्थित होते….
Discussion about this post